Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहिगाव येथे घरफोडीत एक लाखाचा ऐवज लंपास
ऐक्य समूह
Tuesday, September 24, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: re3
5सातारारोड, दि. 23 ः वाठार स्टेशन पोलीस ठाणे हद्दीतील दहिगावच्या शिवारात पंकज माणिकराव चव्हाण यांच्या शेतातील घराचे रविवारी 22 रोजी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून मोबाईल, आयपॅड, कॅमेरे तसेच रोख रक्कम मिळून एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
वाठार स्टेशन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहिगाव, ता. कोरेगाव येथील पंकज चव्हाण यांचे वाठार स्टेशन येथील शेतात घर आहे. त्या घरांमध्ये शेती साहित्य, तसेच सॉफ्टवेअरच्या कामाचे इलेक्ट्रिक साहित्य होते. दिवसभर शेतातील काम करून संध्याकाळी ते दहिगाव येथे गावातील घरी गेले होते. जेवण केल्यानंतर दहिगाव येथेच मुक्कामी राहिले. सकाळी नेहमीप्रमाणे नऊ वाजता पंकज यांचे वडील माणिकराव चव्हाण शेतात गेले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले व आतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब आपल्या मुलाला फोन करून रानातल्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली. सदर ठिकाणी सर्व साहित्य विस्कटलेले होते. त्यामधील दोन कॅमेरे, लॅपटॉप, मोबाईल, आयपॅड, तसेच बँकेची कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन व रोख रक्कम 78 हजार रुपये चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चोरीची खबर वाठार पोलीस स्टेशनला दिली. पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील व सचिन जगताप यांनी घटनास्थळी तपास सुरू केला.  वाठार
पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चोरीच्या व इतर गुन्ह्यांत वाढ झाली
असून मध्यंतरीच्या काळात वाठार स्टेशनमधील अनेक दुकानात चोरी, वीज वितरण महामंडळाच्या ट्रान्सफार्मरच्या चोर्‍या, नांदवळ व तळीये येथे घरफोडी झाली आहे. त्याचा तपास अद्याप वाठार पोलिसांना लावता आला नाही तोवर चोरट्यांनी पोलिसांसमोर हे नवीन आव्हान उभे केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: