Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणाचे दोन दरवाजे एका फुटावर
ऐक्य समूह
Thursday, September 26, 2019 AT 10:54 AM (IST)
Tags: re1
5पाटण, दि. 25 : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात सुरूच राहिल्याने धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाण लक्षात घेवून पूर्वेकडे विनावापर पाणी सोडण्यात येत आहे. सध्या धरणाचे सहापैकी केवळ दोन दरवाजे एका फुटानी उचलून त्यातून 3 हजार 154 व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2 हजार 100 असे प्रतिसेकंद 5 हजार 254 क्युसेक्स पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात येत आहे. 1 जूनपासून आजपर्यंत कोयना धरणात 226.56 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणातून विनावापर तब्बल 110.32 टीएमसी पाणी पूर्वेकडे सोडण्यात आले आहे.
कोयना धरणांतर्गत विभागात अद्यापही पावसाचा जोर सुरूच आहे. त्यामुळे धरणाचे 6 वक्री दरवाजे ज्या पटीत पाण्याची आवक होईल त्याच पटीत उचलले जात आहेत. सध्या धरणात एकूण 104.92 टीएमसी पाणीसाठा आहे.
त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 99.92 टीएमसी इतका आहे, तर पाण्याची उंची 2163.3 फूट इतकी आहे. 1 जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे एकूण 7004 मि.मी., नवजा 8119 मि.मी. तर महाबळेश्‍वर येथे 7053 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: