Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजप उमेदवारांची यादी निश्‍चित
ऐक्य समूह
Monday, September 30, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत मोदी आणि शहांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रात्री साडेदहाच्या सुमारास संपली. बैठकीत भाजपच्या उमेदवारांची नावे निश्‍चित झाल्याची माहिती आहे. तसेच भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसात युतीची घोषणा होईल, असे म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले युतीचे अनेक मुहूर्त टळले आहेत. मात्र युतीची घोषणा काही झाली नाही.  आता शिवसेनेने जवळपास 14 उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत तर भाजपची यादी जाहीर होताच तासाभरात उमेदवरांना एबी फॉर्म वाटले जाणार आहेत. भाजपने विभाग निहाय संघटन मंत्र्यांकडे एबी फॉर्म सुपूर्द केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
युतीच्या घोषणेपूर्वी शिवसेनेने संभाव्य यादी जाहीर करत एबी फॉर्म वाटल्यानंतर आता कुठल्याही क्षणी भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे.
राज्यातील 6 विभागात 6 संघटन मंत्र्यांना एबी फॉर्म घेऊन जाण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.  संघटन मंत्री  मुंबई- सुनील कर्जतकर,  कोकण ठाणे- सतीश धोंडे, उत्तर महाराष्ट्र- किशोर काळकर, मराठवाडा- भाऊराव देशमुख, विदर्भ- उपेंद्र कोठेकर, पश्‍चिम महाराष्ट्र- रवींद्र अनासपुरे यांच्याकडे एबी फॉर्म दिले असल्याची माहिती आहे. यादी जाहीर होताच उमेदवारांना तासाभरात फॉर्म मिळावेत यासाठी भाजपने व्यवस्था केली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: