Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यात 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध
ऐक्य समूह
Monday, October 07, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची आज राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5543 उमेदवारांपैकी 4739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रृटी आढळल्याने 798 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
आज छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात 36 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 56 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 154 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 75 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 101 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 60 उमेदवार, अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 151 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 59 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 181 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 66 उमेदवार, गोंदिया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 71 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 90 उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 125 उमेदवार, नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 327 उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 54 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 81 उमेदवार, जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 133 उमेदवार,   औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 208 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 212 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 69 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 251 उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात 25 मतदारसंघात 272 उमेदवार (वांद्रे पश्‍चिम मतदारसंघाची माहिती रात्री उशिरापर्यंत अप्राप्त), मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 84 उमेदवार, रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 112 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 372 उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 182 उमेदवार, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 202 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 120 उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 मतदारसंघात 82 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात 237 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 108 उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 40 उमेदवार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात 27 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 186 उमेदवार, सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघात 111 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: