Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भादे येथे वीज पडून विवाहिता ठार
ऐक्य समूह
Thursday, October 10, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: re1
5लोणंद, दि. 9 : भादे, ता. खंडाळा येथील सौ. ज्योती कृष्णात चव्हाण (वय 33) या ताठेवस्ती येथील खुरीतील तळे नावाच्या शिवारात शेतामध्ये जनावरे आणण्यासाठी गेल्या असता बुधवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास वीज पडून जागीच ठार झाल्या आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भादे येथील कृष्णात चव्हाण यांचे भादे गावच्या हद्दीत ताठेवस्ती येथील खुरीतील तळे नावाच्या शिवारात शेत आहे. त्यांची शेतामध्ये नेलेली जनावरे आणण्यासाठी त्यांच्या पत्नी ज्योती कृष्णात चव्हाण (वय 33) गेल्या असता सायंकाळी 4.30 च्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी लोणंद येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरानी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: