Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गुन्हा दाखल केला म्हणून पोलिसाची पत्नीला मारहाण
ऐक्य समूह
Friday, November 01, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 31 : पतीकडून होत असलेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरुन पोलीस पतीने त्याच्या पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत सौ. कोमल मदनराव अवघडे (वय 27), रा. केसरकर पेठ, सातारा यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौ. कोमल अवघडे यांचे पती मदनराव ज्ञानेश्‍वर अवघडे, रा. मांडवे, ता. सातारा हे सातारा तालुका  पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. त्यांच्याकडून शारीरिक, मानसिक छळ होत असल्याची तक्रार पत्नी कोमल हिने सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. ही तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरुन दि. 30 रोजी दुपारी मदनराव अवघडे यांनी केसरकर पेठेतील घरी जावून पत्नी कोमल हिला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. याबाबत तक्रारीनंतर पोलिसांनी मदनराव अवघडे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. देशमुख पुढील तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: