Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
ऐक्य समूह
Monday, November 04, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: mn5
5मुंबई, दि. 3 : भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या सूचनेनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा (महा) चक्रीवादळामुळे दि. 6 ते 8 नोव्हेंबरपर्यंत उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रामध्ये वार्‍याचा वेग जास्त राहणार असल्याने मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा समुद्र किनारपट्टीवर येण्याचे कळविण्यात आले आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजनांसह तयारीत राहण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्याचे व कोणत्याही मदतीसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आल्याचे मंत्रालय नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: