Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दानपेटी चोरी प्रकरणी तिघांना अटक
ऐक्य समूह
Monday, November 04, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: re2
5पाटण, दि. 3 : गुजरवाडी घाटातील श्री खंडुआई मंदिराची दानपेटी चोरी प्रकरणी पाटण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 14 हजार 348 रुपयांची रोख रक्कम आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांवर पाटण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान तिघा आरोपींना पाटण न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पाटण पोलिसांनी दिली.
याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील गुजरवाडी घाटात असणार्‍या श्री खंडुआई मंदिरातील दानपेटी दि. 25 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून दानपेटीतील पैसे चोरून नेले होते. याची फिर्याद पुजारी दादासाहेब तुकाराम पवार (वय 34) यांनी पाटण पोलिसात दिली होती. पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र पगडे, पोलीस नाईक रवींद्र कचरे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे या पथकाने श्री खंडुआई मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अनोळखी तीन इसमांचे चेहरे निष्पन्न केले. त्यांचा चाफळ परिसरात कसोशीने शोध घेवून आनंदराव उर्फ आण्णा रामचंद्र पवार (38),  आनंदा अमृत पवार (वय 33, दोघे. रा. शिंगणवाडी, पाटण), दत्तात्रय बाळकृष्ण शिर्के (38, रा. अडूळ, पाटण) यांना ताब्यात घेतले असून त्यांनी चोरी केल्याची कबुलीही दिली आहे. सदर गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम 14 हजार 348 रुपये आनंदराव पवार याच्या राहत्या घरात असणार्‍या जनावरांच्या गोठ्यातून हस्तगत केली. तसेच होंडा पॅशन प्रो मोटरसायकल (क्र. एम. एच. 50. बी. 571) पोलिसांनी जप्त केली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सुनील गायकवाड करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: