Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जबाबदार पक्ष म्हणून त्यांनी वागावे
ऐक्य समूह
Friday, November 08, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: re2
काँग्रेस पुढील दिशा ठरवणार
5कराड, दि. 7 : महाराष्ट्राला स्थिर सरकार दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर अतिवृष्टीचे आज एक मोठे संकट निर्माण झाल आहे. या संकटाकडे कोणाचेच लक्ष नाही. यामुळे आम्ही आमच्यावतीने राज्यपालांना राज्याची सूत्रे हातात घ्या, असे निवेदन दिले आहे. सत्ताधारी सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही. त्यांना सरकार स्थापनेत जास्त रस असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सेना व भाजपला जनतेने बहुमत दिले आहे. त्यांनी जबाबदारीने वागावे, असा सल्ला देत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल तसेच शिवसेना-भाजपच्या भूमिकेनंतर काँग्रेस पुढील दिशा ठरवणार असल्याचे स्पष्ट केले.
स्व. यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यगौरव सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आ. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेसमोर अतिवृष्टीचे मोठे संकट आहे. यामुळे राज्यपालांनी धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकर्‍यांना मदत करावी. खरीप हंगातील पिके उद्ध्वस्त झाली असून रब्बी हंगामाची पेरणी झालेली नाही. यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे.    
 सत्ताधारी सरकारने तातडीने निर्णय घेऊन संबंधित खात्याला निधी देऊन शेतकर्‍यांना मदत करण्याची गरज आहे. मात्र शिवसेना आणि भाजप मुख्यमंत्री कोणाचा यातच अडले आहेत. त्यांना जनतेने सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने वागावे. उद्यापर्यंत सरकार स्थापन झाले नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू शकते.
राज्यातील सत्ता स्थापनेचा अभूतपूर्व प्रसंग निर्माण झाला आहे. स्पष्ट जनादेश मिळूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावरून अडून बसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. शिवसेना सत्तेचे समान वाटप आणि मुख्यमंत्रिपद कार्यकाळही निम्मा निम्मा अशा समीकरणावर कायम आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रिपद सोडून कोणत्याही फॉर्म्युलावर चर्चेला तयार असल्याचे म्हटले आहे. सेना-भाजप जबाबदार राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मते दिली आहेत. तर त्यांनी जबाबारीतून महाराष्ट्रातील जनतेचे उत्तरदायीत्व स्वीकारून काय तो निर्णय घेतला पाहिजे. सत्ताधारी पक्ष काय करतोय ते पाहूया वाट बघू या त्यानंतर पुढे काय पेचप्रसंग निर्माण होतोय, राज्यपाल काय निर्णय घेतात यावर पुढचे निर्णय अवलंबून आहेत.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: