Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Saturday, November 09, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 8 : इलेक्ट्रिक पोलवर काम करीत असताना विजेचा शॉक लागून पोलवरून खाली पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना करंजे गावच्या हद्दीत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आज दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास गोरख बापूराव तरडे (वय 21), रा. मलवडी, ता. फलटण हा युवक करंजे, ता. सातारा गावच्या हद्दीत असणार्‍या आयडीबीआय बँकेसमोरील इलेक्ट्रिक पोलवर काम करत असताना विजेचा शॉक लागून पोलवरून खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: