Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गेल्यावर्षी राज्यभरात निघालेल्या 57 विराट मराठा क्रांती मोर्च्यांद्वारे मराठ्यांच्या एकजूट आणि वज्रमुठीचे दर्शन सरकार-समाजालाही झाले. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात घडलेल्या मुलीवरच्या अत्याचार-बलात्काराच्या एका घटनेने, असंतोषाची ठिणगी मराठा समाजात पडली आणि बघता बघता राज्यभरात मराठी क्रांती मोर्च्यांचा वणवा पसरला. या मोर्च्यांची सांगता राजधानी मुंबईत लक्षावधींच्या अतिविराट, अतिप्रचंड, मोर्च्याने 9 ऑगस्ट क्रांतिदिनी झाली.

Friday, August 11, 2017 AT 11:38 AM (IST)

भारताच्या बाजारपेठात कधी, केव्हा आणि कोणत्या जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीचा भडका उडेल, हे काही सांगता येत नाही. दोन वर्षांपूर्वी कांद्याचा भाव 80 ते 100 रुपयांवर गेला. गेल्या वर्षी तूर डाळ 200 रुपये किलोवर गेली. कांदा आणि अन्नधान्याच्या भावात वाढ होताच, शहरी भागातल्या जनतेला महागाई प्रचंड भडकल्याचे साक्षात्कार नेहमीच होतात.

Thursday, August 03, 2017 AT 11:20 AM (IST)

1990 मध्ये पंतप्रधानपदावर असताना सत्तेचा गैरवापर करून परदेशात कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती केल्याच्या प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्याने, नवाझ शरीफ यांना तडकाफडकी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Monday, July 31, 2017 AT 11:31 AM (IST)

महाराष्ट्रात राजभाषा असलेल्या मायमराठीची अवहेलना आणि उपेक्षा थांबलेली नाही. इंग्रजीशिवाय आधुनिक जगात तरणोपाय नाही, अशा समजुतीचे भूत बोकांडी बसलेल्या मराठी जनतेलाही मायमराठीच्या अनास्थेबद्दल गंभीर विचार करावा, असे वाटत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या अक्राळविक्राळ आक्रमणामुळे आता ग्रामीण भागातल्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळाही बंद पडायला लागल्या आहेत.

Saturday, July 29, 2017 AT 11:17 AM (IST)

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि भ्रष्टाचार महर्षी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सत्तेसाठी गळ्यात बांधून घेतलेले लोढणे फेकून देत, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार अवघ्या 14 तासाच्या आत भारतीय जनता पक्षाशी युती करून बिहारचे पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत.

Friday, July 28, 2017 AT 11:29 AM (IST)

दरवर्षीच्या पावसाळ्यात महानगरी मुंबईत जुन्या चाळी आणि बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारती कोसळून अनेक निरपराध्यांचे मृत्यू होतात. अशा दुर्घटना घडल्यावर राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचे प्रशासन, संबंधितांवर कडक कारवाईची ग्वाही देते आणि या पुढच्या काळात अशा बेकायदा बांधकामामुळे प्राणहानी होणार नाही, अशी दक्षता घ्यायची घोषणाही करते. काही महिन्यांनी अशा घटना जनतेच्या विस्मरणात जातात.

Thursday, July 27, 2017 AT 11:24 AM (IST)

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताचा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या मूलभूत संशोधन आणि विकासासाठी अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जे. भाभा, डॉ. विक्रम साराभाई या शास्त्रज्ञांनी युवक शास्त्रज्ञांना प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणा दिल्यानेच, भारताने या क्षेत्रात विकसनशील राष्ट्रांच्याबरोबरच उत्तुंग झेप घेतली. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ.

Wednesday, July 26, 2017 AT 11:10 AM (IST)

शेतकर्‍यांच्या राज्यव्यापी संप आणि उग्र आंदोलनाच्या दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांची कर्जे माफ करायची घोषणा करून दीड महिना उलटला, तरी या कर्जमाफी योजनेचा घोळ काही संपलेला नाही. कर्जबाजारी शेतकर्‍यांना खरिपाच्या हंगामासाठी दहा हजार रुपयांचे तातडीचे कर्ज द्यायच्या घोेषणेची अंमलबजावणीही झाली नाही.

Tuesday, July 25, 2017 AT 11:25 AM (IST)

सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसमध्ये राहणे म्हणजे राजकीय आत्महत्या होय, असे जाहीरपणे सांगणार्‍या दिग्गज राजकारणी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने, गुजरात राज्यात काँग्रेस पक्षाची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झाली आहे. गेले सहा महिने वाघेला यांनी पक्ष श्रेष्ठींच्या कारभारावर सडकून टीका करीत, जोरदार हल्ले चढवायचे सत्र सुरु ठेवले होते.

Monday, July 24, 2017 AT 11:38 AM (IST)

मुंबईसह राज्यातल्या 27 महानगरपालिकांच्या हजारो नगरसेवकांच्या मासिक मानधनात तब्बल अडीचपटीने वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने, जनसेवेत गर्क असलेले नगरसेवक खूश होतील. गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. 2008 मध्ये मुंबई महापालिकेच्या आणि 2010 मध्ये अन्य महापालिकांच्या नगरसेवकांच्या मानधनात वाढ झाली. पण, गेल्या सात वर्षात मात्र हे नगरसेवक मानधनाच्या वाढीपासून वंचित राहिले होते.

Monday, July 17, 2017 AT 11:32 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: