कणगीतील चिचुंद्री
ऐक्य समूह
Tuesday, March 02, 2010 AT 01:35 AM (IST)
एका मोठ्या कणगीच्या तळाला एक बारीक भोक होतं. त्यातून एक चिचुंद्री कणगीत शिरली. कणगीमध्ये बरेचसे धान्य होते. चिचुंद्रीने त्यावर यथेच्छ ताव मारला व ती परत त्या भोकातून बाहेर पडू लागली. पण केवळ थोडेसे तोंड बाहेर काढण्याव्यतिरिक्त तिला बाहेर पडता येईना. अधाशीपणाने खाल्ल्यामुळे तिचे पोट पहिल्यापेक्षा किती तरी मोठे झाले होते. आपण इथेच अडकून पडणार या विचाराने चिचुंद्री घाबरली व ओरडू लागली. तिचे ते ओरडणे ऐकून दुसरी एक चिचुंद्री तिथे आली व काय झाले याची चौकशी केली. ते ऐकून तिला हसूच आले. ती त्या कणगीत अडकलेल्या चिचुंद्रीला म्हणाली, "हा तुझ्या अधाशीपणाचा परिणाम! जरा स्वस्थ बैस आता. बाहेर पडेपर्यंत कणगीतला एक दाणाही खाऊ नकोस. थोडा उपास घडला, की आपोआप पहिल्यासारखी बारीक होशील नि तुला सहज बाहेर पडता येईल!'
तात्पर्य : बरेच प्रश्न असे असतात, की ते सुटण्यासाठी काही काळ जावाच लागतो.