Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

कर्नाटक
ऐक्य समूह
Thursday, March 04, 2010 AT 12:23 AM (IST)
Tags: vishesh lekh
 कर्नाटकातल्या अल्पसंख्याक समुदायाला भडकायला कोणतेही साधे कारण पुरते. आपल्या धर्माचा अवमान झाल्याच्या आरोळ्या पिटत, अल्पसंख्याकांचा समुदाय संतप्त रस्त्यावर उतरतो आणि दंगल पेटवून सर्वसामान्यांना आपल्या दावणीलाही बांधतो. कर्नाटकातल्या एका कन्नड दैनिकात बांगलादेशच्या वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरिन यांचा लेख रविवारी प्रसिध्द झाला. प्रेषित महंमद पैगंबर हे बुरख्याच्या विरोधात होेते, असा मजकूर त्या लेखात होता.  शिमोगा आणि हसन शहरातल्या अल्पसंख्याक समुदायाच्या भावना या लेखातल्या त्या वादग्रस्त मजकुरामुळे दुखावल्या. सोमवारी शिमोग आणि हसनमध्ये हजारोंच्या संख्येने या लेखाच्या निषेधार्थ अल्पसंख्याक समुदायांचे मोर्चे निघाले. शांततापूर्ण मोर्चाचे हिंसक जमावात रुपांतर झाले. बघता बघता या जमावाने रस्त्यात दिसतील त्या वाहनांना आगी लावायचा सपाटा लावला. पोलीस आणि दुकानांवर तुफानी दगडफेकही केली. या हिंसक जमावाला पांगवायसाठी शिमोग्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मोर्च्यातले दोन जण  ठार झाले. चार जण जखमी झाले. हसन मध्येही हिंसाचार करणाऱ्या जमावाला पांगवायसाठी पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी फोडली, लाठीमार केला. तरीही या शहरात दंगलखोरांनी प्रचंड नासधूस आणि जाळपोळ केल्यामुळे वातावरण तंग झाले.
निषेधासाठी निघालेल्या या मोर्चातल्या लोकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या दहा बस गाड्या पेटवल्या. ट्रॅक्टर्स, दुचाकी वाहनेही जाळून भस्मसात केली. या लेखाच्या निषेधार्थ लोकांनी बंद पाळावा, यासाठी जमावाने दुकानांवरही प्रचंड दगडफेक केल्यामुळे वातावरण  चिघळले. पोलिसांना बळाचा वापर करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
 हिंसक जमावाला पांगवल्यावर प्रशासनाने लागू केलेल्या जमावबंदी आदेशाची या दोन्ही शहरात अत्यंत कडकपणे अंमलबजावणी केल्यामुळे, ही दंगल आटोक्यात आली. अधिक नासधूस आणि जाळपोळीच्या घटना टळल्या.
कर्नाटकचे गृहमंत्री पी. व्ही. आचार्य यांनी दंगलग्रस्त भागाला तातडीने भेट देवून, दंगल करणाऱ्यांना अटक करायचे आदेश पोलिसांना दिल्यावर, आतापर्यंत 44 जणांना अटक करण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे हे शहर असल्यामुळे, ही दंगल घडवणाऱ्या धर्मांधांचा शोध पोलीस घेत आहेत.
ज्या लेखाचे भांडवल करून अल्पसंख्याकांच्या काही पुढाऱ्यांनी आपल्या समुदायाला चिथावणी दिली, तो लेखच आपण लिहिलेला नसल्याचा खुलासा तस्लिमा यांनी तातडीने केला आहे. आपण आतापर्यंत कोणत्याही कन्नड दैनिकाला कसलाही लेख दिलेला नाही आणि असे चिथावणीखोर लेखन आपण केलेले नाही. आपली जाणूनबुजून बदनामी करून, प्रतिमा मलिन करायसाठी हा लेख आपल्या नावावर छापला गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा लेख छापणाऱ्या दैनिकाच्या संपादकांना पोलिसांनी अटक केली असली तरी, ही दंगल अन्य भागात पसरू नये यासाठी संपूर्ण राज्यभर पोलिसांनी कडक बंदोबस्त
ठेवला आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: