Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

कोंबडा, कुत्रा व कोल्हा
ऐक्य समूह
Monday, March 08, 2010 AT 01:09 AM (IST)
Tags: Bodh Katha

एक कोंबडा व एक कुत्रा, दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. एकदा ते दोघे प्रवास करीत होते. प्रवासात रात्री झाडाच्या एखाद्या फांदीवर कोबंडा झोपत असे नि झाडाच्या बुंध्याशी कुत्रा झोपायचा. एकदा रात्र झाल्यावर दोघे झोपी गेले. पहाटे सवयीप्रमाणे कोंबड्याने बांग दिली. कोंबड्याचा आवाज ऐकून एक कोल्हा तेथे आला व कोंबड्याला म्हणाला, "अरे वा! किती दिवसांनी भेट होतेय आपली. मित्रा, तुला अगदी कडकडून मिठी माराविशी वाटतेय.'
हा कोल्हा आपला मित्र नसून शत्रू आहे हे कोंबडा ओळखून होता. पण तसं न दाखवता कोंबडा म्हणाला.
"थांब, मीच खाली येतो. पण पंख दुखावला असल्याने बुंध्याशी मला उतरवून घ्यावं लागेल तुला.'
कोंबडा आयताच आपल्या तावडीत सापडतोय हे पाहून कोल्हा मागचा पुढचा विचार न करता झाडाच्या बुंध्याशी आला आणि इतका वेळ संधीची वाट पाहणाऱ्या कुत्र्याने कोल्ह्यावर झडप घातली. तात्पर्य : लबाड माणूसाची काही वेळा सामान्य माणसाकडूनही फजिती होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: