ज्युुनिअर आशियाई बॅडमिंटन स्पर्धेसाठी कु. घोरपडे हिचा भारतीय संघात समावेश
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 10:26 PM (IST)
फलटण, दि. 10 : येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य शिवाजीराव घोरपडे यांची नात व पुणे येथील बॅडमिंटनपटू कु. संयोगिता घोरपडे हिचा ज्युुनिअर अशियाई बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा मलेशियामध्ये होणार आहे.
कु. संयोगिता ही पुण्यातील ज्युनिअरची अव्वल बॅडमिंटनपटू असून तिने आतापर्यंत अनेक अजिंक्यपदे पटकाविली आहेत.
फोटो गॅलरी