भोंदू साधूंना फाशी देण्याची रामदेव बाबांची मागणी
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 09:59 PM (IST)
सिमला, दि. 10 (वृत्तसंस्था) : महिलांचा विनयभंग करणाऱ्या उपटसूंभ भोंदू साधूंना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी पतंजली योगविद्या पीठाचे संस्थापक आणि योग गुरू बाबा रामदेव यांनी बुधवारी जाहीरपणे केली.
अशा भोंदूबुवांवरचे खटले चालवण्यासाठी शिघ्रगती न्यायालयांची स्थापना व्हावी, अशी सूचना करुन त्यांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दलही आनंद व्यक्त केला. बंगलोरमध्ये नित्यानंद स्वामीच्या भानगडीची व्हिडीओ टेप प्रकाशित झाल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, असल्या तोतया साधूवर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख पथकाची स्थापना झाली पाहिजे. हे असे फसवे लोक भगवे वस्त्र घालून सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूकही करतात, असेही ते म्हणाले.