जेव्हा सोनिया लालूंना चार शब्द ऐकवितात..!
PTI ---
Wednesday, March 10, 2010 AT 01:26 AM (IST)
नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकावर राज्यसभेत झालेल्या चर्चेबाबत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी समाधान व्यक्त केले. सोनिया गांधी आणि लालूप्रसाद यादव यांच्यात झालेल्या अनौपचारिक चर्चेत सोनिया लालूंना म्हणाल्या, तुम्हाला सात मुली आहेत. तुमच्या घरातून तर तुम्हाला किती पाठिंबा आहे, असे विचारले. त्याबाबत आपण दूरध्वनी करून राबडीदेवींना विचारणा करू का, असा प्रश्नही केला. राबडीदेवींना तुम्ही मुख्यमंत्री केले तेव्हा महिला या समाजाच्या अविभाज्य घटक आहेत, त्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे असे सोनियांनी त्यांना ऐकविले. त्यावर लालू निरुत्तर झाले. दरम्यान, सोनियांनी तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनाही आठवण करून दिली की, तुम्ही नाराज आणि संतप्त का झाल्या आहात, कारण विधेयक संमत करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळी तुम्हीही उपस्थित होता.