मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज पाटण दौऱ्यावर
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 01:28 AM (IST)
सातारा,दि. 9 : मुख्यमंत्री ना. अशोक चव्हाण दि. 10 फेब्रुवारी रोजी पाटण दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी 10.20 वाजता त्यांचे हेलिकॉप्टरने मरळी साखर कारखाना, दौलतनगर येथे आगमन होणार असून नंतर ते मोटारीने दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी सोहळा समारंभानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांस ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11.45 ते 1.30 यावेळेत आयोजित केलेल्या जाहीर सभेस उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2.05 वाजता मरळी साखर कारखाना येथून शासकीय हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांसमवेत उपसभापती आणि सहकारमंत्रीही
दौलतनगर येथील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री हर्षवर्धन पाटीलही उपस्थित राहणार आहेत.
फोटो गॅलरी