"माणदेशी'चा उपक्रम स्तुत्य : सौ. भोसले
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 10:49 PM (IST)
सातारा, दि. 11 : जिल्ह्यातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी माणदेशी फौंडेशनच्या माध्यमातून चेतना सिन्हा राबवत असलेले उपक्रम स्तुत्य आहेत, असे प्रतिपादन श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
माणदेशी फौंडेशनतर्फे 40 विद्यार्थिनींना माणदेशी महिला बॅंकेच्या शाखेत मोफत सायकल वाटपप्रसंगी त्या बोलत होते. श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे यांच्या हस्ते सायकल वितरण करण्यात आले. श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, शिक्षणासाठी दूर अंतरावरुन येणाऱ्या मुलींना सायकल वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद बाब आहे. चेतना सिन्हा यांनी माणदेशी फौंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मुलींच्या शिक्षणासाठी सायकल किती उपयोगी आहे याची कारणमिमांसा विशद केल्याने पाश्चात्य देशातील अनेक संस्थांनी सायकलसाठी निधी उपलब्ध करुन दिला. सुमारे 5 हजार डॉलरचा निधी उपलब्ध झाला. त्या निधीतून मुलींना मोफत सायकल वाटपाचा उपक्रम प्रत्येक वर्षी राबविण्यात येत आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ. वैशाली महामुनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाखाधिकारी सौ. वनिता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रेखा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास शाळांचे मुख्याध्यापक, लाभार्थी विद्यार्थी, पालक, बॅंकेचे खातेदार उपस्थित होते.