Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय नाईक सातारा संपर्कप्रमुख
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:20 AM (IST)
Tags: local
सातारा, दि. 10 ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा संपर्क प्रमुखपदी लालबागचे संजय नाईक यांची नियुक्ती राज ठाकरे यांनी अधिकृत पत्र देऊन कृष्णकुंज येथे घोषणा केली.
यावेळी मनसेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी जिल्ह्यातील अनेक आंदोलनाबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. सुमारे अर्धा तास ही कमराबंद चर्चा झाली. त्यामध्ये सातारा जिल्ह्यासंदर्भात अनेक महत्वाच्या सूचना ठाकरे यांनी करून जिल्ह्यातील कार्याचे कौतुक केले. त्यानंतर त्यांना रणजितसिंह भोसले यांनी सातारी कंदी पेढे दिले व संजय नाईक यांनी जबाबदारी स्वीकारून त्यांचा निरोप घेतला. त्यांच्या पुढील कार्यास  ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीबद्दल आ.नितीन सरदेसाई, आ.बाळा नांदगावकर, आ. राम कदम, आ. रमेश वांजळे, आ.वसंत गीते, अविनाश अभ्यंगकर, शालिनीताई ठाकरे, अवधूत चव्हाण तसेच पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाईक यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
आगामी काळात तालुकानिहाय मेळावे व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार असून 9 मार्चपासून सभासद नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. याबाबत सर्वांनी संपर्क साधावा, असे आवाहन रणजितसिंह भोसले यांनी केले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: