Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फतेजा ब्रदर्स कंपनीचा सोमवारी लिलाव
अरुण गोडबोले
Friday, March 12, 2010 AT 12:55 AM (IST)
Tags: local news
सातारा, दि. 11 : महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, पुणे यांचेकडील आदेशान्वये फतेजा ब्रदर्स फोर्ज अँड स्टॅंपिंग प्रा. लि; प्लॉट नं. एफ-6, एमआयडीसी., सातारा या कंपनीकडील वसुली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार वसुली करण्याचे आदेश झाले असून सदर कंपनीच्या सातारा एमआयडीसीमधील मालमत्तेचा जाहीर लिलाव दिनांक 15 मार्च रोजी करण्यात येणार असल्याचे सातारा तहसीलदारांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
फतेजा ब्रदर्स फोर्ज अँड स्टॅंपिंग प्रा. लि; प्लॉट नं. एफ-6, एमआयडीसी., सातारा या कंपनीकडील मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे- कंपनीच्या जमिनीची सरासरी किंमत रुपये 64,292 रुपये तर कारखान्याच्या इमारतीचीकिंमत रुपये 14,53,425 रुपये आहे. कारखान्यातील प्लॅंट, मशिनरी व इतर साहित्याची सरासरीकिंमत रुपये 26,50,780 रुपये अशी एकूण 41 लाख 68 हजार 497 रुपये एकूण सरासरी किंमत आहे, असेही तहसीलदार, सातारा यांनी कळविले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: