Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बुधवारी शिधा पत्रिकेवरील धान्य वाटप तक्रारीबाबत बैठक
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 01:02 AM (IST)
Tags: local
सातारा, दि. 11 : जिल्ह्यातील शिधा पत्रिकेवरील धान्य वाटपावरुन विविध ठिकाणाहून तक्रारी आलेल्या असल्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या आग्रहावरुन जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयात पुरवठा निरीक्षक, धान्य वाटप दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बुधवार, दि. 17 मार्च रोजी आयोजित केली आहे.
तरी ज्या ग्राहकांच्या रेशनकार्ड, रेशन कार्डवरील धान्य वाटप आणि पुरवठा विभागाशी निगडीत काही समस्या असतील तर ग्राहक पंचायतीचे तालुका पदाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात आणून द्याव्यात. त्यानुसार समस्या बैठकीत सोडवून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशाप्रकारचे आवाहन मोहन कुलकर्णी जिल्हाध्यक्ष रंगराव जाधव यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: