Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत वाडीकर यांचे यश
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 10:53 PM (IST)
Tags: local news
सातारा, दि. 13 : महाराष्ट्र साहित्य परिषद युवा मुक्त मंच पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत प्रा. संजीव वाडीकर यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन प्रसिध्द कवीवर्य डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पुण्यभूषण फाऊंडेशन व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या "संमेलन पूर्व संमेलन' या कार्यक्रमांतर्गत पूर्वरंग काव्य संमेलन नुकतेच एस. एम. जोशी सभागृहात पार पडले.
कार्यक्रमासाठी 83 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह वि. भा. देशपांडे, स्वागताध्यक्ष सतीश देसाई, कविवर्य प्रकाश पठारे, हेमंत जोगळेकर,
अरूणा ढेरे, धन:शाम धेंडे व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: