फार्म ट्रॅक ट्रॅक्टरवर भरघोस सवलती जाहीर
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:58 AM (IST)
सातारा, दि. 12 : 41 राष्ट्रे आणि 11 लाख शेतकऱ्यांशी अतूट नाते असलेल्या व डिझेल बचत करून जादा शक्ती देणाऱ्या एस्कॉर्टस्चा फार्म ट्रॅक ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना येथील शिंदे एजन्सीसच्यावतीने भरघोस सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
छापील किंमतीवर आकर्षक सूट, भेटवस्तू याचबरोबर कंपनीच्यावतीने 7 लाखाचा विमा संरक्षण, तीन वर्षांची वॉरंटी, घरपोहच सर्व्हिसिंग अशा अनेक सवलतींचा सहभाग यात आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना जगन्नाथ शिंदे म्हणाले, तुलनेने सर्वाधिक शक्ती, अधिक कार्यक्षमता, डिझेलमध्ये मोठी बचत, ट्रॅक्टर चालविण्यास आनंददायी, आकर्षक मॉडेल्स, स्पेअरपार्ट जागेवर उपलब्ध, उत्कृष्ठ तंत्रज्ञान, विश्वसनीय यांत्रिक, धूरविरहित इंजिन अशा अनेक सोई-सुविधा या ट्रॅक्टरमध्ये असल्याने हा ट्रॅक्टर घेण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा ओढा दिसून येत आहे.
शिंदे एजन्सीज येथे 30 ते 80 एच.पी. चे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फार्म ट्रॅक ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या ट्रॅक्टर खरेदीसाठी सर्व राष्ट्रीय बॅंका, खाजगी बॅंका आणि फायनान्स कंपन्या वाजवी व्याजदरात कर्जपुरवठा करत आहेत. शेतकऱ्यांनी शिंदे एजन्सीजच्या मोळाचा ओढा, मेढा रोडवरील शोरूमध्ये येऊन संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 9960468050 किंवा 9881113090 वर संपर्क साधावा.