राष्ट्रवादी महिलांकडून आरक्षणाचा आनंद साजरा
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 01:02 AM (IST)
सातारा, दि. 12 : महिला आरक्षण विधेयक पास झाल्याने महिला दिनाची भेटच मिळाली. खऱ्या अर्थाने बरेच वर्षे चाललेली लढाई महिलांनी जिंकली याचा आनंदोत्सव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलांनी मराठ मोळ्या पध्दतीने साजरा केला. राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. गीतांजली कदम यांच्या समवेत सर्व महिलांनी एकमेकीला पेढे भरवून गुलाल उधळून, फटाक्याची आतशबाजी करुन आनंद व्यक्त केला. यावेळी सौ. गीता लोखंडे, सौ. वैशाली चितळे, सौ. अमृता पाटील, डॉ. सौ. सुनिता शिंदे, डॉ. सौ. मनीषा पवार, सौ. शालन माने, संगीता कणसे, सुरेखा धोत्रे, शोभा गायकवाड, साधना कळसकर, श्रीमती संजीवनी कपडेकर, सौ. नलिनी जाधव, प्रा. शामल भोरे, सायरा काझी, सारिका जाधव, शांताबाई फडतरे, अलका मोरे उपस्थित होत्या.