यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ होते
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 10:51 PM (IST)
सातारा, दि. 13 : साहित्य व राजकारण यामध्ये सुसंवाद साधणारे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राला लाभलेले सुसंस्कृत व प्रगल्भ व्यक्तिमत्व होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
कला व वाणिज्य महाविद्यालयात माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थाना- वरून बोलत होते. ते म्हणाले, प्राचार्य डॉ. पाटणे म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्राची नाळ माहित असणाऱ्या यशवंतरावांनी राज्य स्थापनेनंतर महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलला. देश संकटात सापडल्यानंतर दिल्लीची हाक आली. महाराष्ट्राचा सह्याद्री यशवंतराव चव्हाण यांच्या रुपाने हिमालयाच्या मदतीला धावला. राजकारणात व्यस्त असतानाही कला-साहित्य व संस्कृतीचे वेड जपणारे व त्यांना उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करणारे रसिक नेतृत्व म्हणूनही यशवंतराव चव्हाण यांची ओळख आहे.
प्रारंभी प्राचार्य डॉ. पाटणे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. आर. के. चव्हाण यांनी आभार मानले. प्रा. पी. व्ही. पाटील, प्रा. सौ. एम. जे. पाटील, प्रा. डॉ. एम. बी. वाघमोडे, प्रा. एस. जी. चव्हाण, प्रा. पी. व्ही. सातपुते, बी. के. गाढवे, आनंदराव काटकर, प्रा. आर. बी. सातपुते, प्रा. विजय पवार, प्रा. जमीर मोमीन, प्रा. गौतम काटकर यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.