स्नेहांकिता क्लबतर्फे आनंदाश्रमास देणगी
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 01:04 AM (IST)
सातारा, दि. 12 : साताऱ्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या "स्नेहांकिता क्लब'च्या महिलांनी आनंदाश्रमास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आनंदाश्रमातील आजी, आजोबांनी यावेळी सादर केलेल्या अभंग गायनाचा आस्वाद स्नेहांकिता क्लबच्या महिलांनी घेतला.
स्नेहांकिता क्लबच्या वतीने श्रीमंत अरुणाराजे भोसले यांनी 5 हजार रुपयांची देणगी प्रदान करुन आनंदाश्रमाच्या कार्याची प्रशंसा केली. आनंदाश्रमाचे उपाध्यक्ष नानासाहेब द्रविड यांनी उपस्थितांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. कार्यवाह डॉ. शाम बडवे यांनी आभार मानले. यावेळी क्लबच्या सदस्या सौ. वैद्य, सौ. विदुला जोशी, सौ. आशा जोशी उपस्थित होत्या.