Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 10:54 PM (IST)
कराड, दि. 13  : जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन नसेल तर जीवन निरर्थक आहे. जीवन आणि विज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न इंदिरा अध्यापिका विद्यालयाने केला आहे, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटणचे अधिव्याख्याता डॉ. कोरडे यांनी केले.
मसूर, ता. कराड येथील इंदिरा अध्यापिका विद्यालयात विज्ञान सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत विद्यापीठाचे संस्थापक सेक्रेटरी बी. टी. किणीकर होते. यावेळी विद्यापीठाचे सदस्य रवींद्र किणीकर, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटणचे अधिव्याख्याता कोकरे, सौ. कर्णे गर्ल्स डी. एड्‌ कॉलेजच्या प्राचार्या सौ. थोरात, सौ. भिडे उपस्थित होत्या.
या विज्ञान सप्ताहात विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साधननिर्मिती, रक्तदान
शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा
स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
होते. व्यसनाधिनता, मूकनाट्य, विद्यार्थ्यांची आत्महत्या या नाटिका सादर करण्यात आल्या.
बी. टी. किणीकर म्हणाले, मानवी शरीर हे अमूल्य आहे. लोकांनी आत्महत्या न करता निसर्गाने दिलेल्या देणगीचा उपयोग समाज व देशासाठी करावा.  कोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्या सौ. थोरगुले, प्रा. बी. ए. पाटील यांनी मार्गदर्शन व नियोजन केले. सप्ताहासाठी संस्थेचे चेअरमन शिरीष किणीकर, व्हाईस चेअरमन सौ.शालिनी किणीकर, संस्थेचे सर्व सदस्य, अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून प्रेरणा मिळाली.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: