Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुस्लीम महिलांनी राजकारणात येण्यास धर्मांधांचा विरोध
pti news
Saturday, March 13, 2010 AT 03:00 AM (IST)
Tags: national
लखनौ, दि. 12 (वृत्तसंस्था) : संसद आणि राज्यांच्या विधानसभांत महिलांना 33 टक्के आरक्षणाची चर्चा सुरू असतानाच, मुस्लीम मुल्ला-मौलवींनी मात्र या महिलांना बुरख्यातच राहण्याचे फर्मान शुक्रवारी काढले आहे.
मुस्लीम महिलांना बुरख्याशिवाय बाहेर फिरण्यास, जाहीर सभांत भाषणे देण्यास आणि हक्क मागण्यास इस्लाम परवानगी देत नसल्याचे सांगून सईद उर रहमान आजमी नदवी म्हणाले, इस्लाम धर्मात महिलांनी बुरख्यात रहावे आणि फक्त घरचे काम करावे असा स्पष्ट आदेश आहे. महिलांना राजकारणात भाग घेण्यास इस्लामची पूर्णपणे बंदी आहे. मुस्लीम महिला शिक्षण घेणे आणि राष्ट्रसेवा करण्यास स्वतंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असलेल्या मुस्लीम महिलांना एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे त्यांनी पुरुष व्हावे, असेही ते म्हणाले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: