कराड येथे "मूल शिकते कसे?' विषयावर 31 रोजी कार्यशाळा
aikya group
Tuesday, July 27, 2010 AT 12:42 AM (IST)
कराड, दि. 26 : येथील स्वच्छंद विहार संस्थेच्यावतीने "मूल शिकते कसे?' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. 31 जुलै रोजी दुपारी 2 ते सायं. 5 या वेळेत स्व. सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात व रविवार, दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.
कार्यशाळेत महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे संचालक प्रा. रमेश पानसे आपले मूल असते कसे? मूल वाढते कसे? मूल शिकते कसे? या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ग्राममंगल संस्थेच्या सहकार्याने सध्याच्या शिक्षणाला पूरक असे हॉबी होम (छंद घर), इंग्रजी-मराठी द्विभाषा समृद्धी वर्ग, भाषा समृद्धी वर्ग, गणित समृद्धी वर्ग आदी उपक्रमांबाबत माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळा सर्व वयोगटातील मुले, त्यांचे पालक व शिक्षकांसाठी असून या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी सौ. प्रज्ञा वाळिंबे मो. 9422605646, डॉ. सौ. शर्वरी बेलापुरे मो. 9822834931, सौ. मुग्धा कुलकर्णी मो. 9970117417 आणि सौ. शिल्पा शहा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थतर्फे करण्यात आले आहे.