Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ओबीसी आरक्षणात मुस्लिमांना खास हिस्सा
PTI ---
Thursday, July 29, 2010 AT 02:58 AM (IST)
Tags: national
नवी दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) : अल्पसंख्याक विषयक केंद्रीय मंत्री खुर्शीद यांनी आज बुधवारी येथे स्पष्ट केले की, देशातील मुस्लिमां-साठी ओबीसी आरक्षणात खास हिस्सा निर्माण करण्याचा केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत आहे.
खुर्शीद म्हणाले, कॉंग्रेसच्या निवडणूक वचनपत्रातही हा मुद्दा सामील आहे. नेहमी यासंदर्भात बोलत आलेलो आहे. ओबीसी आरक्षणात मुस्लिमांना वाटा असावा यासाठी कॉंग्रेस नेतृत्व वचनबध्द आहे. शिवाय सरकार रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचाही विचार करत आहे. एका वृत्तानुसार मुस्लिमांसाठी 10 टक्के आणि अन्य अल्पसंख्याकांना 5 टक्के आरक्षण देण्याची शिफारस रंगनाथ मिश्रा आयोगात नमूद आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: