Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
घरपट्टी न भरलेल्यांना घरचाच रस्ता दाखवा
aikya group
Friday, July 30, 2010 AT 01:57 AM (IST)
Tags: Local News,  
सातारा, दि. 29 : स्वत:च्या घराची घरपट्टी न भरल्यामुळे शासनाने 18 महिने घरी पाठविलेल्या विद्यमान सदस्य असलेल्या उमेदवारास मतदारांनी कायमचा घरचाच रस्ता दाखवावा, असे आवाहन राजे पॅनेलचे प्रमुख संदीप मोझर यांनी केले.
खेड ग्रामपंचायतीच्या विकासनगर वॉर्डमधील कामेश कांबळे, कासम मुल्ला व संगीता महामुनी यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.
सामान्य जनतेला कर भरण्यासाठी जप्ती करण्याची भाषा वापरणाऱ्या विद्यमान सदस्यांनी मात्र आपल्या घराचा कर भरला नाही. शासनाचा महसूल बुडविणाऱ्या या सदस्यांना 18 महिने अपात्र करण्यात आले होते. हे पद पुन्हा मिळण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार केला गेला. भारत निर्माणमधून करण्यात येणाऱ्या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. सत्ताधाऱ्यांनी बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे. ग्रामपंचायतीचे दहा वर्षात ऑडिट झालेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार केल्याचे स्पष्ट होत आहे. या वॉर्डाच्या विकासासाठी कामेश कांबळे, कासम मुल्ला व संगीता महामुनी यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन मोझर यांनी केले.
यावेळी विजय जमदाडे, उदयसिंह पाटील, रियाज मुल्ला, अकबर शेख, गजानन फडतरे, रशिदा शेख, विजया कांबळे, नारायण मखरे, सुजित जाधव, अरविंद डांगे, बाळू  क्षीरसागर, अभिजित जगधने तसेच विकासनगर, यादव कॉलनी, मॅकॅनिकल कॉलनी, गोकर्णनगर, श्रीनगर, न्यू विकास नगर, राजगुरूनगर परिसरातील ग्रामस्थ, महिला व तरूण उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: