Dainik Aikya - Published from Satara(Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  साप्ताहिक भविष्य (चंद्र रास)
मेष
संमिश्र फळे - आपली रास सप्ताहात घटनांच्या माध्यमांतून सतत फ्लॅश न्यूजमध्ये राहील. अश्‍विनी नक्षत्रास सप्ताह संमिश्र फले देणारा. सप्ताहाची सुरवात स्तंभी/वक्री शनीच्या माध्यमातून नोकरीत ताणतणावाची. वरिष्ठांशी विसंवाद, सूर्यग्रहणाजवळ व्यावसायिक दगाफटका. जुगार टाळा, बाकी भरणी नक्षत्रास अतिशय शुभग्रहमान राहील. शैक्षणिक मोठे यश. कृत्तिका नक्षत्रास विवाहयोग.
वृषभ
शुभसूचक सुरवात - सप्ताहाची सुरवात रवी - शुक्र युतीतून अतिशय शुभसूचक. मग नक्षत्रास नोकरीतील पॅकेजमधून उत्तम लाभ. ता. १० व ता. ११ जानेवारी हे दिवस वैयक्तिक मोठ्या सुवार्तांचे. रोहिणी नक्षत्रास घरातील तरुणांच्या कार्यातून सप्ताह विलक्षण राहील.कृत्तिका नक्षत्रास ता. १५ जानेवारीचे सूर्यग्रहण स्त्रीचिंतेचे.
मिथुन
समारंभ गाजतील - सप्ताहात ग्रहयोगांची विलक्षण गर्दी राहील. सप्ताहाची सुरवात पुनर्वसू नक्षत्रास खासच. उत्सव-समारंभ गाजतील. तरुणांना एखादे भव्य यश मोठ्या उत्कर्षाकडे नेईल. अर्थात नोकरीतील विशिष्ट पद मिळेल. पती वा पत्नीचा सांपत्तिक उत्कर्ष होईल. आर्द्रा नक्षत्रास सप्ताह खराब. मृग नक्षत्रास फसवणुकीचे योग.
कर्क
सांभाळून राहा - वक्री ग्रह ऐन हिवाळ्यात ज्वाला काढणारे. सप्ताह तीव्र स्वरूपाची फळे देणारा. पुष्य नक्षत्रास ता. १५ जानेवारीचे सूर्यग्रहण मानसिक पातळीवरून खराब. प्रिय व्यक्तींशी विचित्र भांडणे होतील. आश्‍लेषा नक्षत्रास जुनाट व्याधींतून त्रासदायक ठरणारा सप्ताह. अन्नपाण्यातील संसर्गापासून जपा. पुनर्वसू नक्षत्रास श्‍वानदंश होईल. प्रेमप्रकरणे अस्वस्थ करतील.
सिंह
भरभक्कम लाभ - सप्ताहाच्या सुरवातीस रवी-शुक्र सहयोग नोकरीत उत्तम. उत्तरा नक्षत्रास मोठे भरभक्कम लाभ. स्त्रीमुळे उत्कर्ष होईल. स्पर्धात्मक यश मिळेल. वक्री शनी, मघा नक्षत्रास ता. १३ ते ता. १६ जानेवारी या दिवसांत वादाचा केंद्रबिंदू बनविणारा. घरी वा दारी मानवी विरोध होईल.
कन्या
उन्माद टाळा - सप्ताहात वक्री शनीमुळे एक प्रकारची आणीबाणी घोषित होत आहे. कोणताही उन्माद टाळा. तरुणांनी पथ्ये पाळावीत. ता. १३ ते ता. १६ हे दिवस हस्त नक्षत्रास स्तंभी शनीमुळे अपवादात्मक परिस्थितीतून चिंता निर्माण करणारे. चित्रा नक्षत्रास सामाजिक बहुमानातून लाभ. सरकारी कामात यश मिळेल.
तूळ
मानसिक होरपळ - अतिशय विचित्र स्वरूपाची फळे देणारा सप्ताह. वक्री ग्रहांचा मोठा कुपरिणाम राहील. ता. १३ ते ता. १६ जानेवारी हे दिवस खळबळजनक राहू शकतात. स्वाती नक्षत्रास सूर्यग्रहण मानसिक होरपळीचे. तरुणांच्या समस्या अस्वस्थ करतील. चित्रा नक्षत्रास चोरी, नुकसानीच्या घटना धावपळ करवतील. विशाखा नक्षत्रास वृद्धांची चिंता.
वृश्चिक
नोकरीत मानसन्मान - सप्ताहाची सुरवात ज्येष्ठा नक्षत्रास आत्यंतिक शुभ राहील. नोकरीतील मानसन्मान उत्तम परिणाम साधेल. व्यावसायिक पतप्रतिष्ठेचे एक पर्व सुरू होईल. ता. १० व ता. ११ जानेवारी हे दिवस यशाचा विक्रम नोंदवतील. अनुराधा नक्षत्रास पती वा पत्नीच्या भाग्योदयातून जीवनात स्थिरता लाभेल.
धनु
सांपत्तिक लाभ - रवी-शुक्र युतीचा सप्ताहारंभी विलक्षण अंमल राहील. उत्तराषाढा नक्षत्रास ता. १० व ता. ११ जाने. हे दिवस बोनस शेअर्स देणारे. अफलातून सांपत्तिक लाभ होतील. मूळ नक्षत्रास ता. १३ ते ता. १६ जानेवारी हे दिवस वक्री शनी आणि सूर्यग्रहणातून अतिशय बाधित. कुवार्तांचा भर. घरात अशांतता राहील. नोकरीत वरिष्ठांचा जाच.
मकर
मनःप्रक्षोभ - आपल्या राशीवर वक्री ग्रहांचा स्पष्ट रोख राहीलच. मनःप्रक्षोभ करणारे ग्रहमान वाटते. तरुणांना ता. १३ ते ता. १६ जानेवारी हे दिवस वादळी ठरू शकतात.उत्तराषाढा नक्षत्रास व्याधिजन्य सप्ताह. श्रवण नक्षत्रास सप्ताहाची सुरवात नोकरीत शुभ. वरिष्ठांच्या मर्जीतून भाग्योदय.
कुंभ
"छप्पर फाडके' यश - वक्री ग्रह आणि सूर्यग्रहण आपल्या राशीच्या संदर्भातून प्रदूषणाचे राहील. महत्त्वाचे कार्यक्रम, बैठका वा प्रवास बारगळतील. बाकी सप्ताहाची सुरवात म्हणजे ता. १० व ता. ११ जानेवारी हा दिवस पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास छप्पर फाडके यश देणारा. यशातून बहुचर्चित व्हाल. शततारका नक्षत्रास वक्री शनी ता. १५ च्या सूर्यग्रहणाजवळ विचित्र मनोव्यथेचा.
मीन
नोकरीच्या संधी - वक्री शनीचा स्पष्ट रोख राहील. मानसिक ईसीजी पूर्ण बिघडेल. ता. १३ ते ता. १६ जानेवारी हे दिवस असुरक्षित. व्याधिग्रस्तांनी सांभाळावे. बाकी ता. १० व ता. ११ जानेवारी हे दिवस रेवती नक्षत्रास वैयक्तिक सुवार्तांचा झपाटा ठेवणारे. घरातील विवाह ठरवाल. तरुणांना नोकरीच्या संधींतून सप्ताह लक्षणीयच.
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
Powered By: