Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 104
अवघ्या वर्षापूर्वी शांत असलेले काश्मीर खोरे गेल्या तीन महिन्यात असंतोषाच्या वणव्यात होरपळून निघते आहे. सुरक्षा आणि सुव्यवस्थेसाठी रस्त्यांवर गस्त घालणाऱ्या पोलीस-सुरक्षा दलांच्या तुकड्यांवर हजारो युवकांच्या टोळ्या दगडफेक करीत तुटून पडतात. या हिंसक जमावाला पांगवायसाठी नाइलाजाने पोलिसांना गोळीबार करण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या दोन महिन्यात पोलिसांच्या गोळीबारात 63 जणांचे बळी गेले. तरीही फुटिरतावादाला खतपाणी घालणारे हुर्रियतचे नेते, मात्र या मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खात, असंतोषाच्या वणव्यात अधिकच तेल ओतत आहेत. श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग, बडगाम या भागात गेल्या तीन महिन्यात अशांत परिस्थितीमुळे वारंवार संचारबंदी लागू करावी लागली. महिन्यापूर्वी श्रीनगरमध्ये लष्करही बोलावावे लागले. संचारबंदी किंवा हुर्रियतने दिलेला बंदचा आदेश यामुळे गेले चार महिने, काश्मीर खोऱ्यातील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या भागातील गोरगरीब आणि सामान्य जनतेचा पोटापाण्याचा असलेला पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. लाखो लोकांची उपासमार झाली. पण, त्याची पर्वा आझादीचा नारा देणाऱ्या हुर्रियतवाल्यांना नाही.
Thursday, September 09, 2010 AT 09:04 AM (IST)
तीस वर्षांपूर्वी विधान परिषदेत धरणग्रस्तांच्या समस्यांवर चर्चा सुरु असताना, मुळशी धरणाला विरोध करायसाठी झालेल्या लढ्याचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केल्याचे, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. सेनापती बापट यांनी त्या धरणाला ज्यासाठी विरोध केला, त्या समस्या स्वातंत्र्यानंतरही कायम असल्याचे, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदारपणे सांगत सरकारवर हल्ले चढवले. त्या चर्चेला उत्तर देताना सत्ताधारी कॉंग्रेस सरकारच्या पुनर्वसन मंत्र्यांनी, पहिल्याच वाक्यात विरोधकांना गारद केले. ते म्हणाले, हे सेनापती बापट कोण? सेनापतींचा आणि धरणग्रस्तांचा संबंध काय? मंत्र्यांची ही अक्कल पाहून सारे सभागृह थक्क झाले आणि विधानपरिषदेचे तेव्हाचे सभापती जयंतराव टिळक या उत्तराने संतप्त झाले. सेनापती बापट कोण? हे तुम्हा कॉंग्रेसवाल्यांना माहिती नाही, कारण सत्तेच्या राजकारणाशी सेनापतींचा काही संबंध नव्हता. ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी, दीन दुबळ्यांसाठी, मराठी माणसांच्या हक्कासाठी आयुष्यभर झुंजले. तुम्ही फक्त सत्तेसाठी राजकारणात आला आहात. तुमची सामान्य जनतेशी, तळागाळातल्या माणसाशी नाळ केव्हाच तुटली आहे. तुम्हाला फक्त मतांचे राजकारण कळते.
Wednesday, September 08, 2010 AT 10:35 AM (IST)
भारतीय रुढी- परंपरांच्या साखळदंडात अडकून पडलेल्या, पिचलेल्या स्त्रियांचं भावविश्व वसुंधरा पटवर्धन यांनी कथेच्या रुपानं मराठी साहित्यात प्रथम आणलं आणि स्त्रियांच्या दु:खाला वाचा फोडली. त्यांनी कथा लेखन सुरु करण्यापूर्वी मराठी साहित्यातील स्त्री लेखिकांचं विश्व हे विशिष्ट चाकोरीतच अडकून पडलेलं होतं. ते बंदिस्त झालं होतं. वसुंधराबाईंनी मात्र ही चौकट आपल्या प्रतिभेनं मोडून टाकली आणि स्त्रियांच्या व्यथा वेदनांचा हुंकार, त्यांनी लिहिलेल्या कथांमुळे वाचकापर्यंत पोहोचला. वसुंधरा बाईंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म होती. स्त्रियांच्या मानसिक घुसमटीचाही विचार त्या करीत असत. सामाजिक प्रथांच्या साखळदंडात अडकल्यामुळे स्त्रियांच्या इच्छा आणि आकांक्षांचा कोंडमारा कसा होतो, त्यांच्या समस्या मूक कशा राहतात, याचेही यथार्थ दर्शन त्यांनी घडवलं. 1951 मध्ये त्यांचा  "संसार शोभा' हा पहिला कथा संग्रह प्रसिध्द झाला आणि वसुंधराबाईंच्या स्वतंत्र शैलीच्या साहित्य लेखनाची प्रशंसा झाली. या यशानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अखंड चाळीस वर्षे त्यांनी प्रामुख्याने कथा लेखन केले.
Tuesday, September 07, 2010 AT 10:42 AM (IST)
नूतन गंधर्व विनायकराव उर्फ आप्पासाहेब देशपांडे यांच्या निधनाने अखेरचा गंधर्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे, देशातल्या गंधर्व युगाचा अस्त झाला आहे. वयाची ऐंशी वर्षे उलटल्यावरही त्यांची संगीत आराधना मात्र नियमितपणे सुरुच होती. विद्यार्थी-विद्यार्थिनींना ते संगीताचा रियाझही देत असत. अलीकडे सहा महिने मात्र त्यांची प्रकृती खालावली. वयोमानानुसार गात्रे थकली, तरीही शास्त्रीय संगीताचे सूर त्यांना मोहिनी घालत. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी सुरु केलेली गानविद्येची उपासना अखेर वयाच्या 86 व्या वर्षी सात तपांनी संपली. बालगंधर्वांनी देशाच्या शास्त्रीय संगीतात गंधर्व युग सुरु केले. सवाई गंधर्व, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व आणि नूतन गंधर्व या चौघांनी गंधर्व युगाचा वारसा जपला आणि पुढेही नेला. बालगंधर्व, सवाई गंधर्व आणि छोटा गंधर्व, कुमार गंधर्वांना नावलौकिक आणि सामाजिक प्रतिष्ठा सन्मान मिळाले. पण नूतन गंधर्वांच्या वाट्याला मात्र जीवनभर उपेक्षाच आली.  जयपूर, आग्रा आणि किराणा या तीनही घराण्याची गायकी आत्मसात असलेल्या या गुणी गायकाचे शेवटपर्यंत स्वत:च्या मालकीचे घरही होऊ शकले नाही.
Saturday, September 04, 2010 AT 10:27 AM (IST)
आंब्यापासून "वाईन' तयार करायचे तंत्र लखनौच्या केंद्रीय कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांनी शोधून काढले, ही बातमी मद्य रसिकांसाठी आनंदाची ठरावी. द्राक्ष आणि इतर धान्यापासून भारतात तयार होणाऱ्या वाईन प्रमाणेच आंब्याच्या वाईनलाही चांगलीच मागणी राहील. "वाईन' म्हणजे दारु नव्हे, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी यापूर्वीच सांगून टाकल्यामुळे नियमितपणे वाईन पिणाऱ्यांचा "दारुडे', असा लौकिक होणार नाही, असा दिलासा मद्य रसिकांना  मिळाला. परिणामी गेल्या दहा वर्षात दारुच्या निर्मितीत देशाने आघाडी मिळवली. महाराष्ट्रात तर ज्वारी, बाजरी आणि अन्य धान्यापासून दारु निर्मितीचे कारखाने सुरु करायसाठी राज्य सरकारनेच कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाची खैरात "दारु सम्राटां'वर केली. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया हे पाश्चात्त्य देश परंपरेने वाईन आणि व्हिस्की, व्होडका, ब्रॅंडीच्या निर्मितीत गेली अनेक शतके प्रसिध्द आहेत. जागतिकीकरणाच्या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे, सर्व क्षेत्रातली आव्हाने स्वीकारायची मोठी जबाबदारी देशातल्या उद्योजकांवर आली. औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. निर्यात वाढली.
Friday, September 03, 2010 AT 08:13 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: