|
|
|
Total Results: 90
|
|
|
|
|
हिंदुस्थानात "रामा'बरोबर एका घरी एक मुलगा रहात असे. रामाच्या समागमात राहणारा हा मुलगा एके दिवशी छपरावर जाऊन "अहं ब्रह्मास्मि' असे मोठ्याने ओरडू लागला.ते ऐकून काही शेजारचे गृहस्थ त्याला म्हणाले की, बेट्या, तू काय बडबड चालविली आहेस? मी ईश्वर आहे असे तू म्हणतोस काय? तू ईश्वर आहेस तर मार पाहू छपरावरुन उडी. तुला काही इजा झाली नाही, तर तुझे ईश्वरत्व आम्ही कबूल करू. पण, जर काही तुला दुखापत झाली, तर आम्ही तुला मारू आणि तुझा छळ करू. अशी अधर्म्य किंवा पागंडी भाषा तू वापरू नको. ईश्वरी प्रेमाने भारुन गेलेला तो मुलगा त्यांना म्हणाला, हे माझ्या आत्म्यांनो, मी उडी मारण्याला तयार आहे. सांगाल त्या खळग्यात आणि दाखवाल त्या समुद्रात उडी ठोकण्याची माझी तयारी आहे. पण, मी जेथे नाही असे एखादे स्थल आधी मला दाखवा. कारण, मी जेथे नाही तेथेच मला उडी मारता येईल. मी नाही अशी जागाच कोठे नाही. मी देवाचा देव आहे. सर्व ठिकाणी जो व्यापून राहिला आहे तो उडी कोठे व कशी मारणार? जो येथे आहे आणि तेथे नाही असा मर्यादित मनुष्यच उडी घेऊ शकेल.
Thursday, September 09, 2010 AT 09:10 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
क्षुद्र लोकांनी आपले स्वातंत्र्य विकावे, तुम्ही तसे करु नये. आम्ही स्वतंत्र आहो असे या देशातील लोक म्हणतात. कदाचित त्यांना राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले असेल पण, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या ते दास्यत्वात आहेत! "राम' तुमच्यासमोर विचारस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य, सर्व तऱ्हेचे स्वातंत्र्य मांडत आहे. जो धर्म "राम' तुम्हाला सांगत आहे त्याला काही लोक वेदांत असे टोपण नाव देतात. पण, त्याला थट्टेचे किंवा निंदाव्यंजक असे कोणतेही नाव देऊ नये. खरा वेदांत वेदांमध्ये साठवून ठेवलेला नाही. तो तुमच्या अंत:करणातही आहे. म्हणून "राम' तुम्हाला एकदाच असे बजावून ठेवतो की, "राम' केवळ हिंदी नाही, तो अमेरिकनही आहे. राम हिंदू आहे असे समजू नका, तो ख्रिस्तीही आहे. तो अमुक एका पंथाचा किंवा मताचा दास आहे असे मानू नका. राम तुमचा आत्मा, केवळ स्वातंत्र्य आहे. दुसरा एक जण रामाला म्हणू लागला की, अहो जर तुम्ही ईश्वर आहा, ख्रिस्तासारखे महात्मे आहा, तर ख्रिस्तासारखे काही थोडेसे चमत्कार करुन दाखवा म्हणजे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. रामाने उत्तर दिले, हे बंधो, ख्रिस्ताने चमत्कार करुन दाखविले, तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
Wednesday, September 08, 2010 AT 10:39 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मी जर ईश्वर आहे, तर प्रत्येक वस्तूचे ज्ञान मला का नाही? असा एकाने प्रश्न केला. तुम्ही ईश्वर आहा, देव आहा असे राम नेहमी सांगत असतो. हे ऐकून एका मनुष्याने विचारले की, मी जर ईश्वर आहे तर मला सर्वाचे ज्ञान का नाही? रामाने त्याला विचारले, तू ईश्वर नाहीस तर कोण आहेस? तो म्हणाला मी देह आहे. राम म्हणाला, ठीक आहे. तू देह आहेस, तर मग  हे डोके तुझेच आहे, त्यावर केस किती आहेत हे सांग पाहू. तसेच देहात हाडे, स्नायू किती आहेत? आज पहाटे सेवन केलेले अन्न जठरात, आतड्यात, फुफ्फुसात, मूत्रपिंडात, दुसरीकडे कोठे आहे ते सांग पाहू. याचे उत्तर त्याला काही देता येईना. केस, हाडे, स्नायू हे जरी तुम्हाला सांगता येत नाहीत तरी ते तुमचे आहेत. खाल्लेले अन्न कोठे गेले किंवा कोठे आहे हे जरी तुम्हाला सांगता आले किंवा न आले तरी ते तुमच्याशिवाय दुसरे कोणीही खाल्ले नाही, आणि त्या अन्नावर पुष्ठ झालेला देह तुमचा आहे हे खास. याप्रमाणे, आकाशात तारे किती आहेत हे जरी तुमच्या बुद्धीला सांगता न आले तरी ते तुमचेच आहेत. इंग्लंड देशात किंवा बुध ग्रहावर यावेळी काय प्रकार चालला आहे, हे जरी तुमच्या बुध्दीला सांगता आले नाही तरी ते प्रदेश तुमचेच आहेत.
Tuesday, September 07, 2010 AT 10:47 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जेथे "मी' या शब्दाने "शरीर किंवा मन' असा अर्थ समजला जातो, त्या देशात वेदांताचा उपदेश करणे फार कठीण आहे. "मला आत्मा आहे,' असे येथील लोक म्हणतात आणि मी म्हणजे शरीर, मन किंवा जीव असे समजतात. वेदांती "मी'चा अर्थ असा केव्हाही घेत नाही. शरीर, मन इत्यादी मी नाही. मी जर काही असेन, तर मी ईश्वर आहे असे तो म्हणतो. "मी ईश्वर आहे' हे विधान "मी राजा आहे,' "मी स्वामी आहे', "मी गरीब आहे', "मी अमेरिकन आहे', "मी हिंदू आहे' इत्यादी विधानांसारखे नाही. ते त्याहून निराळे आहे. राजा, स्वामी, गरीब वगैरे माझ्या उपाध्या, पदव्या अथवा गुणधर्म आहेत. त्याप्रमाणे ईश्वरत्व माझा गुणधर्म नाही. "मी ईश्वर आहे,' हे विधान "रज्जु भुजंग आहे' या विधानासारखे आहे. "भुजंग काळा आहे' या वाक्यात काळेपणा हा भुजंगाचा गुण आहे. पण "रज्जु भुजंग आहे' या विधानात रज्जु किंवा भुजंग हा गुण नाही. भुजंग काळा आहे, रज्जु भुजंग आहे या दोन्ही वाक्यातील भेद लक्षात ठेवा. याप्रमाणे, "मी पवित्र आहे, मी देवदूत आहे' हे एक तऱ्हेचे विधान आहे. "अहं ब्रह्मस्मि' असे हिंदू जेव्हा म्हणतो, तेव्हा "मी' याचा अर्थ हे शरीर नव्हे, तुम्ही चुकीने असे समजता.
Sunday, September 05, 2010 AT 10:39 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कर्मतत्त्वाप्रमाणे हल्लीच्या परिस्थितीत विषमता आमच्या पूर्वकर्मांनी उत्पन्न केली आहे. यावरुन असे दिसते की, आमच्या पूर्वजन्मातही कर्मे, वासना, इच्छा यातील वैचित्र्य असले पाहिजे. काहीजण पूर्वजन्मी रोगी, कित्येकजण दरिद्री तर काही श्रीमंत असले पाहिजेत. हे भेद कशाने झाले? याचे उत्तर असे आहे की, त्याही पूर्वीच्या जन्मातील संस्कारभेदाने. तिसऱ्या जन्मातील विषमता त्याही पूर्वीच्या म्हणजे चौथ्या जन्मातील संस्कारभेदाने. याप्रमाणे पाहता कर्मतत्त्वामुळे, वरील प्रश्न न सुटता तो अधिक बिकट होत जातो. कालाच्या आरंभीही - कालाला आरंभ असेल तर या तत्त्वाप्रमाणे - विषमता आणि विरोध आहेच. आता या प्रश्नाचे स्वरुप असे आहे की, ईश्वराने अनादिकालापासून ही विषमता का ठेवली? अनादिकालापासून ईश्वराने एके ठिकाणी श्रीमंत किंवा निरोगी आणि दुसरे ठिकाणी दरिद्री किंवा रोगी का ठेवले असावे? हे किती अवास्तव आणि अयोग्य दिसते बरे! या विषमतेचे समर्थन कसे करावयाचे? वेदांत सांगतो की, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले पाहिजे. उत्तर देण्याची जबाबदारी वेदांतावर नाही.
Saturday, September 04, 2010 AT 10:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
| 1 2 3 4 5 ... |
|