|
|
|
Total Results: 104
|
|
|
|
|
राजस्थान   जोधपूर मधल्या मथुरदास माथूर रुग्णालयातल्या डॉक्टरना, रुग्णांच्या  नातेवाईकांनी आणि पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राजस्थान राज्यातल्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या संपामुळे राज्यभरात 63 रुग्णांचे मृत्यू झाले. मंगळवारी उशिरा डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला असला, तरी सरकारने डॉक्टरांना पूर्णपणे संरक्षण देण्याची हमी दिली पाहिजे, अशी मागणी केली आहे. मथुरदास रुग्णालयातल्या पॉलिट्रामा विभागात रुग्णांच्या नातेवाईकांनी घुसून वैद्यकीय उपकरणांची मोडतोड केली. तिथल्या डॉक्टरांनाही चोपून काढले. ही घटना समजताच रुग्णालयातील सर्व डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी संघटितपणे या मारहाणीचा निषेध केला. रुग्णालयात आलेल्या पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या डॉक्टर्सवर लाठीमार केल्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. या रुग्णालयासह राज्यातील जयपूर, बिकानेर, कोटा आणि अन्य  जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टर बेमुदत संपात उतरले. परिणामी राज्यातील सर्व रुग्ण सेवा पूर्णपणे ठप्प झाली. रुग्णालयातील हजारो रुग्णांना औषधेही मिळाली नाहीत आणि त्यांच्यावर उपचारही बंद झाले. अत्यावश्यक शस्त्रक्रिया होवू शकल्या नाहीत.
Thursday, September 09, 2010 AT 09:06 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नक्षलवाद्यांनी पळवून नेऊन ओलीस ठेवलेल्या दोन पोलीस अधिकारी आणि एका कॉन्स्टेबलला नक्षलवाद्यांनी सोडून दिल्याने, मुख्यमंत्री नितीशकुमार हे एका संकटातून मुक्त झाले आहेत.  दिनांक 28 ऑगस्ट रोजी लखीसराय जंगलातल्या कजरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील शितलकोरानी जंगलात वीस जवान आणि नक्षलवाद्यांत पाच तास सशस्त्र चकमक झाली. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या तुकडीला तीनशे नक्षलवाद्यांनी घेरून अचानक गोळीबार केला. पाच तासांच्या धुमश्चक्रीत पोलिसांचा दारुगोळा संपला. आठ जवान या चकमकीत ठार झाले. आठ जण जखमी झाले. उरलेल्या चौघांना नक्षलवाद्यांनी पळवून नेले होते. या चारही जणांची सुटका करायसाठी त्यांनी, तुरुंगातल्या आठ नक्षलवाद्यांना  विनाअट मुक्त करायची मागणी केली होती. नक्षलवाद्यांशी याबाबत चर्चा करायला आपण तयार आहोत, असे नितीशकुमार यांनी जाहीर करूनही, नक्षलवाद्यांच्या टोळीशी संपर्क झाला नव्हता. आपली मागणी मान्य झाली नाही तर, चारही जवानांना ठार करायच्या धमक्या नक्षलवादी सतत देत होते. तुरुंगातल्या नक्षलवाद्यांना मुक्त करायसाठी त्यांनी सरकारला दिलेली पहिली मुदत संपली. त्यानंतर त्यांनी पुन्हा आठ तासांची मुदत दिली.
Wednesday, September 08, 2010 AT 10:36 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
  तिरुपती श्री बालाजी हे जगातले सर्वात श्रीमंत देवस्थान! या देवस्थानची नेमकी मालमत्ता आणि संपत्ती किती आहे, याची मोजदादही करता येत नाही. दहा अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या, बालाजी संस्थानच्या मालकीचे सोनेच वीस मेट्रिक टनाच्यावर आहे. त्यात अमूल्य रत्ने, माणके, जवाहिर आणि रत्नजडीत दागिन्यांचाही समावेश आहे. गेली सातशे वर्षे श्री बालाजीला सोन्या-चांदीचे दागिने भक्तांच्याकडून अर्पण केले जातात. राजा कृष्णदेवरायासह अनेक राजांनी श्री बालाजीला अमूल्य दागिने अर्पण केले होते. शतकानुशतके आणि दररोज बालाजीच्या या सोन्याच्या साठ्यात वाढ होते आहेच. हे सारे सोने मंदिराच्या परिसरात खजिन्यातच साठवले आहे. प्राचीन दागिन्यांची नेमकी किंमत किती? याचा अंदाज काही देवस्थानलाही करता येणारा नाही. कारण, जागतिक बाजारात सोन्याच्या आणि रत्नांच्या सध्याच्या किंमतीपेक्षा त्याचे मूल्य हजारो पटीने अधिक आहे. गेल्या काही वर्षात बालाजीच्या दागिन्यांच्या खजिन्यातील काही अमूल्य दागिने इथल्या कर्मचाऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी पळवले. लंपास केले. मुळ सोन्याच्या दागिन्यांच्या ठिकाणी नकली दागिने ठेवले.
Tuesday, September 07, 2010 AT 10:43 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
देशातल्या शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार मिळवून द्यायसाठी गेली 26 वर्षे अखंड संघर्ष करणारे शेतकऱ्यांचे लाडके नेते खा. शरद जोशी यांनी शुक्रवारी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. शेतकरी संघटनेची स्थापना त्यांनी केली, तेव्हा बरोबर असलेले त्यांचे काही सहकारी संघटना सोडून गेले. त्यांनी स्वतंत्र शेतकरी संघटना स्थापन केल्या. पण, शरद जोशी यांनीच शेतकऱ्यांतला स्वाभिमान जागृत करुन, त्यांना सरकारविरुध्द लढाईसाठी रणांगणात आणले, हे श्रेय सर्वस्वी जोशींचेच, त्यांचे हे जुने सहकारीही नाकारीत नाहीत. अर्थशास्त्राचे गाढे व्यासंगी अभ्यासक असलेले जोशी संयुक्त राष्ट्रसंघात उच्च पदावर नोकरीत होते. त्यांना पगारही भरपूर होता. पण, 1976 मध्ये ते नोकरी सोडून मायदेशी परतले आणि पुण्याजवळच्या आंबेठाण गावात कोरडवाहू जमीन विकत घेवून शेती करु लागले. अर्थशास्त्राचे पुरेपूर ज्ञान असलेल्या जोशींना, शेती का परवडत नाही, याचा उलगडा स्वत:च शेती केल्यामुळे झाला. दरम्यान याच काळात पुण्यात कांद्याचे भाव मातीमोल झाले. कांद्याला उत्पादन खर्चाशी सांगड घालून भाव मिळावा, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले.
Saturday, September 04, 2010 AT 10:27 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
  देबू देवधर हे मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतले फक्त चलत्चित्र छायाचित्रकार नव्हते. चित्रपटाची कथा, सामाजिक परिस्थिती, चित्रपटातील भूमिका, निसर्ग, काळ, या साऱ्यांचा प्रचंड अभ्यास करूनच, ते छायाचित्रण करीत असत. त्यामुळेच त्यांनी छाया-चित्रित केलेल्या सर्व चित्रपटांची, प्रचंड प्रशंसा झाली. ते अत्यंत निर्दोषपणे चित्रपटाचे छायाचित्रण करीत असत. छायाचित्रण हा त्यांचा श्वास होता. बालपणा-पासूनच छायाचित्रणाची आवड असलेल्या देबूंनी, सहाय्यक छायाचित्रकार म्हणून चित्रपट-सृष्टीत प्रवेश केला. सतत प्रयोग करायची वृत्ती आणि कलात्मकता जपायसाठी धडपड या गुणामुळे, त्यांनी चित्रपटांच्या छायाचित्रणाचे तंत्र अवघ्या पाच वर्षातच आत्मसात केले. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि गाजलेल्या "आक्रित', या चित्रपटाचे छायाचित्रण स्वतंत्रपणे देबूंनी केले होते. दिग्दर्शक असलेल्या श्रावणी देवधर या त्यांच्या पत्नी. देबू आपल्या पत्नीलाही दिग्दर्शनाचे धडे देत असत. आपण स्वीकारलेला चित्रपट हा पूर्णपणे परिपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या निर्दोष असावा, असा त्यांचा आग्रह असे.
Friday, September 03, 2010 AT 08:14 AM (IST)
|
|
|
|
|
|
| 1 2 3 4 5 ... |
|