|
|
|
Total Results: 164
|
|
|
|
|
सातारा, दि. 19 ः भुईंज, ता. वाई येथील शेतकरी दांपत्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्या मोझर कुटुंबियांचे कर्ज माफ करून त्यांच्या कुटुंबियांना नैतिक आधार द्यावा, तसेच त्या कुटुंबाचा कर्जमाफीमध्ये समावेश का नाही, याची सखोल चौकशी व्हावी व अशी घटना घडल्यास शासनाने भरीव तरतूद देण्यासाठी उपाययोजना करावी, याबाबत राजे प्रतिष्ठानतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, सातारा जिल्हा हा बळीराजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या याच जिल्ह्यामध्ये या बळीराजाचा आक्रोश ऐकणारं शासनच कानावर हात ठेवून गप्प आहे आणि याचाच परिणाम म्हणजे  भुईंज, ता. वाई येथील सुरेश मोझर व त्यांच्या पत्नी सौ. शोभा मोझर यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. जिल्ह्यातील अशा कितीतरी शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. यावर  शासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. मोझर कुटुंबीय मूळचे वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील न्हाळेवाडी येथील असून धोम प्रकल्पामुळे विस्थापित झाल्याने भुईंज येथील चाहूर वस्तीनजिक त्यांना जमीन मिळाली.
Friday, August 20, 2010 AT 10:02 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 19 : येथील रहिवासी व सध्या विरार पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदावर कार्यरत असलेले युसूफ बागवान यांना पोलीस खात्यातील सर्वोच्च असा राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. बागवान यांनी यापूर्वी कोल्हापूर एल. सी. बी., लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर, अंबरनाथ, भिवंडी, सिंधूदुर्ग जिल्हा येथे उल्लेखनीय सेवा केली आहे. यापूर्वी त्यांना महसूलमंत्री ना. नारायण राणे यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
Friday, August 20, 2010 AT 09:57 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 18 : वयाची सत्त्याहत्तरी ओलांडतानाही न थकता, प्रसन्न मुद्रेने आणि प्रेरक वाणीने युवकांना प्रयत्नवादातून यशस्वितेचा मार्ग दाखविणारे प्राचार्य रमणलाल शहा लिहीत असलेले "ज्ञानदेवेरचिला पाया... तुका झालासे कळस' हे पुस्तक  नव्या पिढीला निश्चितच दिशादर्शक  राहील असा विश्वास जिल्हाधिकारी संभाजीराव कडू-पाटील यांनी बुधवारी व्यक्त केला. सातारा येथील प्राचार्य रमणलाल शहा सरांच्या "ज्ञानदेवे रचिला पाया... तुका झालासे कळस' या पुस्तकाच्या संहिता लेखन पूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, कर सल्लागार अरुण गोडबोले  उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, सर ज्योतिष-शास्त्राचे गाढे अभ्यासक आहेतच.पण आता केवळ त्या अभ्यासातच अडकून न पडता त्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना करून देत, मोठे शब्दभांडार समाजापुढे रिते करण्याचा प्रयत्न केला आहे. आज या पुस्तकाची संहिता पूजन करताना पुस्तक लवकरच पूर्ण होवून त्यांच्या या पुस्तकाला भविष्यातही मोठी मागणी कायम राहील असा विश्वासही  कडू-पाटील यांनी व्यक्त केला.
Thursday, August 19, 2010 AT 10:53 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 18 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दि. 1 जूनपासून पाणीदरात अन्यायकारक वाढ केल्याच्या निषेधार्थ व्यापक जनआंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत जीवन प्राधिकरणाची देयबीले न भरण्यासह दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरबझार येथील कनिष्क मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्षा सौ. सुजाता राजेमहाडीक, निशांत पाटील, शंकर माळवदे, ऍड. दत्ता बनकर, भाजपाचे नरेंद्र पाटील, राजेंद्र चोरगे, संजय पाटील, बाळासाहेब गोसावी, ऍड. विलास आंबेकर, सौ. स्नेहल नलावडे, पाणी पुरवठा समितीचे सभापती सुनील जाधव, रणजित साळुंखे, सौ. अलका लोखंडे, सिध्दार्थ निकाळजे, सौ. अनुसया गायकवाड व संजय साठे उपस्थित होते. प्रास्ताविक करताना शंकर माळवदे म्हणाले, मंत्रालयातील सचिव, उपसचिवांना या दरवाढीचा काहीही फरक पडत नाही. समान्य नागरिक या दरवाढीमुळे त्रस्त झाला आहे. यासाठी व्यापक जनआंदोलन उभे करुन पाणी बीले न भरण्याचा निर्णय सर्वांनी घ्यावा.
Thursday, August 19, 2010 AT 10:42 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 18 ः फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशनच्या आवाहनानुसार देशभरातील किमान दोन लाख विक्री प्रतिनिधी कर्मचारी विविध मागण्यांसाठी दोन दिवस संपावर असून बुधवारी साताऱ्यातील वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निदर्शने केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.      निवेदनात पुढे म्हटले आहे, की  वैद्यकीय प्रतिनिधींच्या अखिल भारतीय फेडरेशनने सातत्याने केंद्र सरकारकडे विक्री प्रतिनिधींच्या कामाचे स्वरूप सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्टमध्ये सामील करण्याची तसेच इतर मागण्यांसाठी पाठपुरावा केला असून केंद्र सरकारने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाखाली काहीही कारवाई केली नाही. जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी कराव्यात, जीवनाश्यक औषधांची सूची लागू करावी, सार्वजनिक क्षेत्रातील औषध व लस उत्पादित करणाऱ्या कंपन्या सुरू कराव्यात, औषधांच्या काळ्या बाजाराची व भ्रष्ट विपणन पद्धतीची उच्चस्तरीय चौकशी करावी या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील विक्री प्रतिनिधी हे दोन दिवस संपावर आहेत.
Thursday, August 19, 2010 AT 10:40 AM (IST)
|
|
|
|
|
|
| 1 2 3 4 5 ... |
|