|
|
|
Total Results: 123
|
|
|
|
|
नीरा, दि. 19 :  निर्मलग्राम पुरस्कार मिळालेल्या नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचे बाजारतळ परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. नीरा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाल्यापासून ग्रामपंचायतीने बाजारतळ परिसरात करण्यात येणारी स्वच्छतेची कामे बंद केली असून या परिसरात ग्रामपंचायतीच्या घंटागाडीनेही  फिरकणे बंद केले आहे. नीरा शहरातील ग्रामपंचायतीच्या बाजारतळ परिसरात दररोज भाजी मंडई आणि मच्छी विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. नीरा शहरातील बुधवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने ग्रामपंचायतीचे कर्मचारी मंगळवार आणि गुरुवार या दिवशी आठवड्यातून केवळ दोन वेळा बाजारतळ परिसरात स्वच्छतेची कामे करतात. त्याचप्रमाणे बाजारतळावरील रहिवाशांच्या घरातील कचऱ्याच्या निर्मूलनासाठी दररोज ग्रामपंचायतीची घंटागाडी कचरा उचलण्यासाठी फिरत होती.  नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीची दि. 30 रोजी पंचवार्षिक निवडणूक होवून 15 दिवस उलटले तरी बाजारतळ परिसरात स्वच्छता आणि घंटागाडीच्या सुविधेकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायतीची घंटागाडी काही दिवस नादुरुस्त झाल्याने घंटागाडीची सोय उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली होती.
Friday, August 20, 2010 AT 10:01 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भुईंज, दि. 19 : भुईंज विकास सोसायटी आणि देशभक्त आबासाहेब वीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था आहे. या संस्थांच्या संचालकांच्या नियोजनबध्द कारभारामुळेच या दोन्ही संस्थांनी सभासदांचा विश्वास जिंकला आहे. या संस्थांचा उंचावणारा आलेख जिल्ह्यातील इतर संस्थांनासुध्दा आदर्शवत असल्याचे प्रतिपादन किसनवीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी केले. येथील भुईंज विकास सोसायटी व देशभक्त आबासाहेब वीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या दोन्ही संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन मदन रामचंद्र भोसले, पतसंस्थेचे चेअरमन विलासभाऊ जाधवराव, व्हाईस चेअरमन पांडुरंग शेवते, सुनील शिंदे, शेखर भोसले-पाटील, भुईंजचे सरपंच अर्जुन भोसले,  उपसरपंच सूर्यवंशी, राजेश कांबळे उपस्थित होते. भोसले म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात 941 विकास सोसायट्या आहेत. त्यामध्ये भुईंज सोसायटीचा 3 रा नंबर लागतो. लवकरच ही सोसायटी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असेल याची सर्वांना खात्री आहे.
Friday, August 20, 2010 AT 09:59 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुख्यमंत्र्यांचा नांदेड, अजितदादांचा पुणे आणि मुश्रीफांच्या कोल्हापूरचा समावेश कराड, दि. 18 (आनंदराव पाटील) : सन 2009-10 या वर्षात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत अधिकाधिक गावे तंटामुक्त करुन राज्यात अव्वल ठरलेल्या नांदेड, पुणे ग्रामीण आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या गावांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली असून या समित्या पुनर्मूल्यांकनाचे काम करुन येत्या 15 दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहेत. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 2007 मध्ये राज्यातील गावे स्वच्छतेतून शांततेकडे गेल्यानंतर ती शांततेतून समृध्दीकडे जाण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्तगाव मोहीम ही अभिनव चळवळ लोकसहभागातून राबवण्यास प्रारंभ केला. या मोहिमेचे हे तिसरे वर्ष असून गेल्या दोन वर्षात सुमारे साडेसहा हजार गावे तंटामुक्त होवून त्यांनी लाखो रुपयांची बक्षिसे शासनाकडून स्वीकारली आहेत.
Thursday, August 19, 2010 AT 10:38 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पाटण, दि. 18 : आमचा राष्ट्राभिमान वाढल्याशिवाय देशाची प्रगती होवू शकणार नाही. वन्दे मातरम् हा प्राणमंत्र घेवून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यसैनिक दु:खी आहेत. जे दिवंगत झाले त्यांचा आत्माही अतृप्त असणार याची आपणाला जाणीव झाल्याशिवाय देशाचे वैभव वाढणार नाही. आज आपण ज्या ज्या क्षेत्रात आहोत तेथे प्रामाणिकपणे काम करून नि:स्वार्थपणे सेवारत राहिलो तरच देशाची प्रगती होवू शकते, असे प्रतिपादन आदिमठाध्यक्ष नीलकंठ महाराज यांनी केले. तीर्थक्षेत्र धारेश्वर, ता. पाटण येथील धारेश्वर गुंफा मंदिरात नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी धारेश्वर महाराज यांच्या हस्ते 15 ऑगस्ट निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धारेश्वर महाराज पुढे म्हणाले, भ्रष्टाचाराने भारताला गुरफुटून टाकले आहे. जोपर्यंत भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होवू शकत नाही. आजच्या परिस्थितीत लाखो गरीब उपाशी मरत आहेत. धान्याची कोठारे सडून जात आहेत. हे प्रगतीचे लक्षण आहे का? निसर्गाने या देशाला खूप प्रेम दिलेले आहे. भारत देशाबरोबरच महाराष्ट्रावरही ईश्वराची खरोखरच कृपादृष्टी आहे.
Thursday, August 19, 2010 AT 10:37 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पाटण, दि. 18 : पाटण आगारातून सुरू असलेल्या पाटण-कोल्हापूर, पाटण-सांगली, पाटण-इस्लामपूर, इस्लामपूर-चिपळूण या फेऱ्या आगार व्यवस्थापनाने बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वास्तविक पाहता प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या फेऱ्या वाढवून अगर सुरू असलेल्या फेऱ्या बंद न करता त्या सुरू ठेवणे अपेक्षित असताना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता या फेऱ्या आगार व्यवस्थापनाने बंद का केल्या? हे प्रवाशांना कळून येत नाही. प्रवासी त्या मार्गावर बस फेऱ्या सुरू असतील अशी समजूत करून घेवून प्रवासाला जाण्यासाठी बाहेर पडतात. मात्र वाहतूक नियंत्रक कक्षात चौकशी केल्यानंतर या फेऱ्या बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याने प्रवाशांपुढे पाटणहून कराड व कराडहून मिळेल त्या गाडीने पुढे जाणे भाग पडत आहे. थेट गाडी असेल तर सामानाची चढउतार करणे टाळता येते. मात्र थेट गाडी नसल्याने सामान घेवून चढ-उतार करणे वृध्द प्रवाशांना अवघड होत असल्याने या फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी प्रवाशी वर्गातून मागणी करण्यात येत आहे.
Thursday, August 19, 2010 AT 10:37 AM (IST)
|
|
|
|
|
|
| 1 2 3 4 5 ... |
|