Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 22
मनुष्य पुन्हा बोका, कुत्रा यांच्या जन्माला जातो काय? हे सर्व मनुष्याच्या परिस्थितीवर अवलंबून राहील. पुढील जन्म सद्य: परिस्थितीवर अवलंबून आहे. याविषयी एक गोष्ट सांगतो. भगवान बुध्दापाशी दोन गृहस्थ आले. एकाने विचारले, "महाराज, माझ्या स्नेह्याला पुढील जन्मी कोणती गती प्राप्त होईल? हा नेहमी मनामध्ये कुत्र्याचा विचार बाळगतो आणि कुत्र्याप्रमाणे कर्म करतो. पुढील जन्मी हा कुत्रा नाही का होणार?' दुसरा म्हणाला, "महाराज, हा माझा मित्र सर्वतोपरी बोका आहे, तेव्हा पुढल्या जन्मी हा बोका नाही का होणार?' भगवान बुध्द म्हणाले, "बाबांनो, जसे तुमचे संस्कार असतील तसे तुम्हाला फल मिळेल. मात्र तुम्ही हा सिध्दांत उलटा लावत आहा. तो तुला बोका म्हणतो, तू त्याला कुत्रा म्हणतोस. परंतु विचार करा, की जो गृहस्थ आपल्या स्नेह्याला कुत्रा लेखतो त्याने आपल्या मनाने कुत्र्याचा स्वभाव पसंत केला आहे, कुत्र्याचे संस्कार तो धारण करीत चालला आहे, मरणोत्तर तो अवश्यमेव कुत्रा होईल. त्याचप्रमाणे जो आपल्या मित्राला बोका समजतो, तो स्वत:च बोका होईल. जो जशी भावना धरील तसा तो होईल. जशी मती तशी गती.
Monday, August 30, 2010 AT 07:01 AM (IST)
प्रणवाचा जप अर्थ न समजता केला तर त्यापासून काही फायदा होईल काय? - हिमालयात राहणारे मुनी प्रणवाचे किंवा दुसरे गाणे म्हणतात किंवा एखादे वाद्य वाजवितात. ते ऐकून सर्प, हरीण आणि इतर वन्य पशू आपले स्थान सोडून मुनीकडे धावत येतात. या प्राण्यांना संगीताचे नियम किंवा गाण्याचे अर्थ काही माहित नसतात. पण, त्यांच्यावर गाण्याचा परिणाम घडून आल्याने ते मोहित होतात. हरीण, सर्प यावर ध्वनीचा जर असा परिणाम होतो तर प्रणवध्वनीचा तुम्ही एकसारखा जप केला असता त्याचा तुमच्या जीवनावर काही परिणाम होणार नाही काय? प्रत्येक गाण्याला किंवा संगीताला तीन अंगे असतात. 1) गाण्याचा अर्थ, 2) संगीताचे नियम किंवा रागदारी, 3) गाण्याचा स्वर किंवा ध्वनी. ही तिन्ही अंगे तुम्हाला पूर्णपणे अवगत असली तर तुम्हास गाणे अतिशय आवडेल. यापैकी एखादे जरी अंग माहित असले तरी सुध्दा तुम्हाला गाणे थोडेबहुत तरी आवडेल. सर्प, हरीण नुसता ध्वनी ऐकतात. त्यांना गाण्याचा अर्थ किंवा संगीताचे नियम यांचे काही ज्ञान नसते. असे आहे तरी ते गाण्याने मोहून जातात. कित्येकजण सवयांच्या गाण्यातील संगीताच्या नियमांनी मोहित होतात. त्यांना गाण्याच्या अर्थाचे काही महत्व वाटत नाही.
Monday, August 23, 2010 AT 06:48 AM (IST)
अंत:करणापासून निघालेली उपासनाच परिणाम-कारक होते. गळ्याच्या वरून निघालेले म्हणजे नुसते तोंडाने म्हटलेले उपासनेचे मंत्र म्हणजे निवळ थट्टा आहे आणि परमेश्वराला खोटा पाडण्यासारखे आहे. चित्ताची जशी अवस्था तशी उपासनेची तऱ्हा किंवा तेज. विद्यार्थ्यांची प्रार्थना (क) ये त्रिषप्ता: परियन्ति विश्वारुपाणि बिभ्रत: वाचस्यातिर्बला तेषा तम्वो अद्य दधातु मे।। पुनरेहि वाचस्पते देवेन मनसा सह। वसोस्पते निरमय मय्येवास्तु मयि श्रुतम्‌।। इहैवामिव तनूभे अर्त्नी इवज्यया। वाचस्पतिनिर्यच्छतु मय्येवास्तु मयि श्रुतम्‌। उपहूतो वाचस्पतिरुपास्मान्‌ वाचस्पतिर्व्हयताम्‌। संश्रुतेन गमे महिमा श्रुतेन विराधिषि।। (अथर्ववेद कांड 1. अ. 1 सू.1) अर्थ : हे वाचस्पते, जे तीन गुण आणि सात पदार्थ नाना रुपे धारण करून व्यापून राहिले आहेत त्यांचे बल माझे ठायी स्थापित कर. हे वाचस्पते, पुन: दिव्य मनाने ये, हे वसोस्पते, मला आनंदित कर. माझे ज्ञान तुझे ठायी स्थिर होवो. धनुष्याची दोन्ही टोके एका दोरीने ताणलेली असतात, तुझे गुरुशिष्य दोघे सज्ज असोत. गुरु नियमाने चालो, आणि ज्ञान माझे ठायी स्थिर होवो.
Tuesday, August 03, 2010 AT 09:53 AM (IST)
भाई, खरे सांगतो की, उपासक किंवा भक्त होणे आपल्या नशीबीच नाही. साऱ्या दुनियेत एकच सच्चा उपासक मी पाहिला, इतर भक्त, ऋषी, मुनी, पीर पैगंबर आपणाला "प्रेममय उपासक' असे म्हणवीत असतात. पण ही एक बातच होय. हा सच्चा भक्त किंवा उपासक कोण? ज्याला आपण आपले उपास्य दैवत समजतो तोच. हे कसे? तर तो प्रियकराप्रमाणे आडून आडून सतावतो, हळूच चित्तवृत्तीचा पदर खेचतो, नाना प्रकारची रुपे व वेश धारण करून आमच्या अंगाच्या (अहंकाराच्या) पडद्यावर नेत्रांची चोच मारतो, अनात्म वस्तूच्या ठिकाणी आमचे मन लागताच तो इतका काही रुसतो की विचारु नका. भुवया वाकड्या व वर करुन क्रोधाचा कसा अविर्भाव आणतो. चित्तवृत्ती मार्गात अडल्या की तो चिमटे काढतो. जराही दम खाऊ देत नाही. रामनामाच्या निष्काम शय्येशिवाय इतर कुठेही क्षणभर नावालाही तो आराम पडू देत नाही. जिवलगा, एकदा प्रियकर झाल्यावर आता रुसणे फुगणे का? रास चाखून झाल्यावर आता नटतोस काय? हे प्राणनाथ, इकडे पाहा, तो दुष्ट शिशुपाल पुढे सरला आणि तुमच्या स्वामिनीला घेऊन चालला.
Sunday, August 01, 2010 AT 10:26 AM (IST)
टेलिफोनद्वारा मनमोहनाने प्रेमसंवाद केला. टेलिफोन गोड वाटला. मनमोहन दूर होता तोपर्यंत टेलिफोनची किंमत होती. परंतु मनमोहन आता घरी आल्यावर त्या टेलिफोनचे काय काम? आपले इष्टमित्र, स्नेहीसंबंधी, राजेरजवाडे, धनदौलत हे सर्व टेलिफोन असून त्याच्या द्वारा राम आमच्याशी बोलत होता. जोपर्यंत रामाची भेट नव्हती तोपर्यंत मन कापत होते आणि टेलिफोनशिवाय कसे चालेल असे वाटत होते. आता माझा प्यारा राम घरी आला व कडकडून भेटला. मित्रांनो, तुम्ही मला आता सोडा. आप्तेष्टांनो, मला टाकून चला. धनदौलत लुटली जावो. मानसन्मान, तुम्ही पाठमोरे व्हा. आता येथे तुमचा काय उपयोग? राजाजी, मला हद्दपार करा, आणि आपले जग आपल्या घरी ठेवा. राजा रुठे नगरी राखे अपनी। मैं हर रुठे कहां जाना?।। अर्थ : राजा रुसला तर आपली नगरी राखून बसेल. पण हरि रुसला तर मी कुठे जाऊ? अब दिलबर घर आया है। नैनोंका फर्श बिछाऊंगी। गुण औगुण पर धर चिन्गारी। यह मैं धूप धुकाऊंगी। प्राणों का मैं सेज करुंगी। हरि को गले लगाऊंगी।। अर्थ : आता मोहन घरी आला आहे.
Tuesday, July 27, 2010 AT 09:38 AM (IST)
1 2 3 4 5
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: