Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  साप्ताहिक भविष्य (सूर्य रास)
मेष (मार्च २१ - एप्रिल २०)
मोठे आर्थिक लाभ रवि पहिला. धंदा व्यवसायाला चालना देऊ शकाल. भाग्येश गुरू मोठे आर्थिक लाभ करुन देईल. विवाह जुळतील. विद्याभ्यासात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मनावर दडपण असले तरी पती-पत्नीत सामंजस्य राहील. सप्ताहाचे सुरुवातीस संततीचा सहवास लाभेल. नावडते काम मागे लागेल. मोबदला कमी मिळेल. इतरांचे सहकार्य उशीराने मिळवू शकाल. सप्ताहाचे शेवटी सर्दी पडशाने थकवा जाणवेल. अनुकूल दिनांक : 26, 27, 28, 29.
वृषभ (एप्रिल २१ - मे २१)
पात्रतेप्रमाणे संधी लाभेल रवि बारावा. आर्थिक नुकसान संभवते. शेतीवाडीसाठी खर्च होईल. पात्रतेप्रमाणे रोजगाराची संधी मिळू शकेल. महत्वाकांक्षी बनाल. कामाची व उत्पादनाची गुणवत्ता वाढवा. गुंतागुंतीच्या व्यवहाराशी संबंध येईल. सप्ताहाचे सुरुवातीस शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या जाणून घ्या. एकाकीपणे काम सुरू कराल. सप्ताहाचे शेवटी इतरांचे सहकार्य लाभू शकेल. अनुकूल दिनांक : 28, 29, 30, 1.
मिथुन (मे २२ - जून २१)
अपेक्षेप्रमाणे आर्थिक प्राप्ती रवि अकरावा. अपेक्षेप्रमाणे आर्थिक प्राप्ती होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. कौटुंबिक खर्च वाढेल. पती-पत्नीत विसंवाद होणे शक्य आहे. शैक्षणिक प्रगती होईल. विवाह जुळून येऊ शकतील. सप्ताहाच्या सुरुवातीस आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराव्या लागतील. महत्वाच्या गाठीभेटी घ्याव्या लागतील. कामात थकवा जाणवेल. संततीचा सहवास लाभेल. मोबदला कमी मिळेल. अनुकूल दिनांक : 25, 30, 1.
कर्क (जून २२ - जुलै २२)
विपरित घटनेतून लाभ संभवतो रवि दहावा. अपेक्षेप्रमाणे आर्थिक प्राप्ती होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. राजकीय क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. मार्केटमधील पत कमी होईल. विपरित घटनेतून फायदा संभवतो. क्रोध आवरू. पती पत्नीत सामंजस्य राहू शकेल. सप्ताहाचे सुरुवातीस कौटुंबिक खर्च होईल. महत्वाच्या कामासाठी खूप धावपळ येईल. त्यामुळे एक दोन थकवा येईल. घराच्या जबाबदारीकडे व संततीकडे लक्ष राहील. अनुकूल दिनांक : 26, 27.
सिंह (जुलै २३ - ऑगस्ट २१)
भाग्यकारक संधी रवि नववा. एखादी तरी चांगली संधी लाभेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठेची काळजी राहील. गृहसौख्य कमी लाभेल. एखाद्या कामाची मंजुरी अपेक्षित असेल तर ती मिळेल. गुप्त कारस्थानांचा त्रास संभवतो. सप्ताहाच्या सुरुवातीस वेगाने कामे कराल. स्वत:कडे व कुटुंबाच्या समस्यांकडे लक्ष देता येईल. महत्वाच्या कामासाठी धावपळ होईल. शारीरिक थकवा जाणवेल. घराकडे लक्ष राहील. अनुकूल दिनांक : 25, 28, 29.
कन्या (ऑगस्ट २२ - सप्टेंबर २३)
आरोग्य सांभाळा रवि आठवा. स्वत:चे जोडीदाराचे, घरातील वृध्दांचे आरोग्य सांभाळा. निराश होण्यासारख्या घटना धंदा व्यवसाय, नोकरीच्या बाबतीत घडतील. नातेवाईकांची सरबराई करावी लागेल. वैवाहिक जीवनात कडवटपणा राहील. सप्ताहाची सुरुवात खर्चिक व आळसाने होईल. रेंगाळलेली कामे एक दोन दिवसात पूर्ण कराल. कौटुंबिक खर्चासाठी पैसा उपलब्ध होईल. सप्ताहाच्या शेवटी महत्वाच्या कामासाठी धावपळ होईल. अनुकूल दिनांक : 26, 27, 30, 1.
तूळ (सप्टेंबर २४ - ऑक्टोबर २३)
अहमपणा सोडा रवि सातवा. अहमपणा दूर ठेवला तर पती- पत्नीत सहकार्याचे वातावरण राहू शकेल. रोजगाराची एखादी संधी मिळेल. विवाह जुळतील. विद्यार्थ्यांना करिअरसंबंधीचे निर्णय घेणे अवघड जाईल. सप्ताहाच्या सुरुवातीस लाभदायक घटना घडतील. एक दोन दिवस आळसात जातील. खर्च वाढतील. कामे रेंगाळली तरी एक दोन दिवसात ती पूर्ण कराल. कुटुंबाच्या गरजा भागवाव्या लागतील. अनुकूल दिनांक : 25, 28, 29.
वृश्चिक (ऑक्टोबर २४ - नोव्हेंबर २२)
महत्वाकांक्षी कामे यशस्वी होतील रवि सहावा. महत्वाची कामे हातात घ्या. ती यशस्वी होतील. धंदा व्यवसायात आव्हानात्मक परिस्थिती राहील. एखादी भाग्यकारक संधी लाभू शकेल. पती-पत्नींनी एकमेकांच्या आवडीनिवडी जपणे गरजेचे राहील. गृहसौख्य कमी लाभेल. सप्ताहाचे सुरुवातीस मानसन्मान लाभेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. एक दोन दिवस खर्चिक व कंटाळवाणे जातील. रेंगाळलेली कामे सप्ताहाचे शेवटी पूर्ण कराल. अनुकूल दिनांक : 25, 26, 27, 30, 1.
धनु (नोव्हेंबर २३ - डिसेंबर २२)
नशिबाची थोडी साथ लाभेल रवि पाचवा, नशीबाची थोडी साथ लाभेल. आर्थिक प्राप्ती वाढेल. संततीसौख्य लाभेल. तशी मनाची थोडी कुचंबणा होत राहील. आपल्या छंदाकडे लक्ष देता येईल. अति महत्वाकांक्षी बनाल. सप्ताहाचे सुरुवातीस कामाचे नियोजन करा. त्याप्रमाणे कार्यवाही करू शकाल. केलेल्या कामाचा मोबदला मिळेल. सप्ताहाचे शेवटी खर्च वाढेल. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल. अनुकूल दिनांक : 26, 27, 28, 29.
मकर (डिसेंबर २३ - जानेवारी २०)
मन उद्विग्न राहील रवि चवथा. गृहसौख्याची काळजी राहील. कायदेशीर बाबींकडे लक्ष द्या. भानगडीच्या व्यवहारापासून दूर रहा. कलागुणांना वाव मिळेल. शिक्षण, करिअर, विवाहाचे बाबतीत अनुकूलता लाभेल. सप्ताहाची सुरुवात सर्दी पडशाने होईल. थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. मान सन्मान लाभेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल. अनुकूल दिनांक : 28, 29, 30, 1.
कुंभ (जानेवारी २१ - फेबृवारी १९)
धंदा-व्यवसायाला चालना देऊ शकाल रवि तिसरा. धंदा-व्यवसायाला चालना देऊ शकाल. विद्यार्थी आपले शैक्षणिक उद्दिष्ट पूर्ण करू शकतील. आशावादी राहतील. क्रोध आवरा. मित्रांच्याकडून फसवणूक होणे शक्य आहे. शारीरिक सौख्य कमी लाभेल. सप्ताहाच्या सुरुवातीस सहकार्याचे वातावरण राहील. एक दोन दिवस सर्दी पडशाने थकवा येईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामाचे नियोजन कराल व त्याप्रमाणे कार्यवाही होईल. अनुकूल दिनांक : 25, 30, 1.
मीन (फेबृवारी २० - मार्च २०)
कष्टाला पर्याय नाही रवि दुसरा. कष्टाशिवाय पैसा मिळणार नाही. गरोदर महिलांनी काळजी घेणे हिताचे राहील. पती-पत्नीत कडवटपणा राहील. दूरचे प्रवास घडतील. तुमच्याजवळील कौशल्याचा व बुध्दिचातुर्याचा उपयोग होईल. सप्ताहाचे सुरुवातीस कमी मोबदल्यात काम करावे लागेल. तुमचे यश इतरांच्या मदतीवर अवलंबून राहील. एक दोन दिवस सर्दी पडशाने थकवा जाणवेल. सप्ताहाचे शेवटी चांगली बातमी समजेल. अनुकूल दिनांक : 25, 26, 27.
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: