|
|
|
|
|
|
|
एका जंगलात एक पारधी आपल्या बायको-मुलांसह राहत होता. एके दिवशी नेहमीसारखा सकाळी उठून शिकारीसाठी म्हणून निघाला तर त्याच्या एकुलत्या एक मुलाने त्याच्याबरोबर जाण्याचा हट्ट चालविला. पारध्याने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण मुलगा ऐकायला तयार होईना. शेवटी त्याने मुलाला बायको जवळ दिले व पारधी शिकारीसाठी निघून गेला. इकडे मुलाने रडून रडून झोपडी डोक्यावर घेतली. त्याची आई तर अगदी वैतागून गेली.
Wednesday, March 10, 2010 AT 12:56 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एका कासवाला आकाशातील चंद्र-तारे याबद्दल फार उत्सुकता होती. शिवाय आकाशातून ही पृथ्वी कशी दिसते हेही त्याला पाहायचे होते. शेवटी मनाचा हिय्या करून कासव एका गरुडाकडे गेले व म्हणाले, "गरुडदादा, तू मला आकाशातून जर एकदा फिरवून आणलेस तर मीही तुला पृथ्वीच्या पोटातील रत्नांच्या खाणी दाखवीन. गरुडाला कासवाचे म्हणणे पटले व लगेच त्याने कासवाला आपल्या बळकट पंजात घट्ट पकडून आकाशात उड्डाण केले. खूप उंचावरून पृथ्वीचे दर्शन घडविले. कासव अगदी खूष होऊन गेले.
Tuesday, March 09, 2010 AT 01:19 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एक कोंबडा व एक कुत्रा, दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. एकदा ते दोघे प्रवास करीत होते. प्रवासात रात्री झाडाच्या एखाद्या फांदीवर कोबंडा झोपत असे नि झाडाच्या बुंध्याशी कुत्रा झोपायचा. एकदा रात्र झाल्यावर दोघे झोपी गेले. पहाटे सवयीप्रमाणे कोंबड्याने बांग दिली. कोंबड्याचा आवाज ऐकून एक कोल्हा तेथे आला व कोंबड्याला म्हणाला, "अरे वा! किती दिवसांनी भेट होतेय आपली. मित्रा, तुला अगदी कडकडून मिठी माराविशी वाटतेय.
Monday, March 08, 2010 AT 01:09 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एकदा एक लांडगा काही तरी भक्ष्य मिळेल या आशेने एका गावात शिरला. एका घराच्या बागेतच एक मोठा कुत्रा साखळीने बांधलेला त्याला दिसला. लांडग्याला पाहून कुत्रा मोठ्या ऐटीने त्याला म्हणाला, "काय रे हे तुझं जिणं! उपाशीपोटी काही तरी खायला मिळेल का हे पहात वणवण करायची....काही नाही मिळालं, की पुन्हा गुहेत जाऊन निपचिप पडायचं! त्यापेक्षा माझं बघ! मी कसा खाऊन पिऊन धष्टपुष्ट आहे तो...' त्यावर लांडगा म्हणाला, "तू म्हणतोस ते खरं आहे.
Sunday, March 07, 2010 AT 02:24 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एकदा एक लांडगा काही तरी भक्ष्य मिळेल या आशेने एका गावात शिरला. एका घराच्या बागेतच एक मोठा कुत्रा साखळीने बांधलेला त्याला दिसला. लांडग्याला पाहून कुत्रा मोठ्या ऐटीने त्याला म्हणाला, "काय रे हे तुझं जिणं! उपाशीपोटी काही तरी खायला मिळेल का हे पहात वणवण करायची....काही नाही मिळालं, की पुन्हा गुहेत जाऊन निपचिप पडायचं! त्यापेक्षा माझं बघ! मी कसा खाऊन पिऊन धष्टपुष्ट आहे तो...' त्यावर लांडगा म्हणाला, "तू म्हणतोस ते खरं आहे.
Sunday, March 07, 2010 AT 01:52 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एका बोरीच्या रानात एका म्हातारीने बरीच बोरे गोळा केली. ती एका लहान तोंडाच्या घागरीत ठेवून म्हातारी आणखी बोरे आणण्यासाठी पुन्हा इकडे तिकडे फिरू लागली. तिने घागरीत बोरे ठेवलेली एका माकडाने पाहिले होते. म्हातारी दूर गेलेली पाहून माकड हळूच घागरीजवळ गेले व त्याने बोरे पळविण्यासाठी घागरीत हात घातला. बचकभर बोरे हातात घेऊन ते पळणार होते पण हातात बोरे असल्याने त्या घागरीतून बोरांसकट त्याला हात बाहेर काढता येईना.
Saturday, March 06, 2010 AT 12:54 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सैन्याच्या अग्रभागी रणशिंगे फुंकणारी काही माणसे असतात. त्यातल्या एकाला शत्रूकडील सैनिकांनी पकडून आपल्या सेनापतीकडे नेले. सेनापतीने त्यास कैदेत टाकण्याचा हुकूम दिला. त्यावर त्या शिंग फुंकणाऱ्याने गयावया करीत म्हटले, "महाराज, माझ्यावर दया कर.मी कोणालाही मारलेले नाही, कोणाला दुखापत केलेली नाही. इतकेच काय, मला शस्त्रदेखील चालवता येत नाही! केवळ हे शिंग फुंकण्यापलीकडे मला काहीच येत नाही. हे शिंग वाजवण्याबद्दल मला कैद करणे, हा माझ्यावर अन्याय आहे.
Friday, March 05, 2010 AT 01:01 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सिंह, लांडगा व कोल्हा यांनी यापुढे एकत्र शिकार करायची व जे काय मिळेल ते आपसात वाटून घ्यायचं असं ठरवलं. पहिल्याच खेपेला त्यांना एक खेचर चरताना दिसले. सिंह एका झुडपाआड दबा धरून बसला. लांडग्याने व कोल्ह्याने मिळून खेचराला झुडपाच्या बाजूने हुसकत नेले. सिंहाने या आयत्या सावजावर एकदम झडप घातली व त्याला ठार मारले. खेचराला मारल्यावर सिंह बाजूस झाला व त्याने लांडग्यास शिकारीचे वाटे करावयास सांगितले.
Thursday, March 04, 2010 AT 12:29 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एका शेतकऱ्याकडे खूप कोंबड्या होत्या. पण एक कोल्हा नेहमी त्याच्या कोंबड्या पळवी. म्हणून शेतकऱ्याने त्याला पकडण्यासाठी सापळा लावून ठेवला. येण्याजाण्याच्या वाटेवर सापळा असल्याने एका रात्री कोल्हा नेमका सापळ्यात अडकला. त्याने सुटण्यासाठी खूप प्रयत्न केले पण व्यर्थ! पहाटे पहाटे त्याची धडपड ऐकून एक कोंबडा तेथे आला. कोंबड्यास पाहताच कोल्हा म्हणाला, "बघ, तुझ्यामुळे मी या सापळ्यात अडकलो. पहाटे तुझा आवाज ऐकून तुला भेटायला म्हणून आलो नि या संकटात सापडलो.
Tuesday, March 02, 2010 AT 10:29 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एका मोठ्या कणगीच्या तळाला एक बारीक भोक होतं. त्यातून एक चिचुंद्री कणगीत शिरली. कणगीमध्ये बरेचसे धान्य होते. चिचुंद्रीने त्यावर यथेच्छ ताव मारला व ती परत त्या भोकातून बाहेर पडू लागली. पण केवळ थोडेसे तोंड बाहेर काढण्याव्यतिरिक्त तिला बाहेर पडता येईना. अधाशीपणाने खाल्ल्यामुळे तिचे पोट पहिल्यापेक्षा किती तरी मोठे झाले होते. आपण इथेच अडकून पडणार या विचाराने चिचुंद्री घाबरली व ओरडू लागली.
Tuesday, March 02, 2010 AT 01:35 AM (IST)
|
|
|
|
|
|
|