आर्थिक वसुलीची कामे दुपारपूर्वी करा. दुपारनंतर कामे रेंगाळतील. महिला : संततीबद्दल चांगली बातमी समजेल. दुपार-नंतर कामाचा कंटाळा येईल. युवक : दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. प्रतिष्ठा सांभाळा.
वृषभ
आज केलेल्या कामाचा मोबदला आजच मिळू शकेल. लोकांच्याकडून तुमचे कौतुक होईल. महिला : घर, कुटुंब व संततीकडे लक्ष राहील. दिवस जवळजवळ चांगला जाईल. युवक : सायंकाळचा वेळ मित्रांसमवेत घालवाल. विवाह जुळतील. नवीन रोजगार मिळेल.
मिथुन
आज मनात योजलेले काम सायंकाळपर्यंत पूर्ण होऊ शकेल. महिला : भावंडांशी संपर्क होईल. घरातील समस्यांची जाणीव असेल. युवक : तुमची गुणवत्ता वाढविण्याच्यादृष्टीने कामाचे नियोजन करा.
कर्क
दूरच्या प्रवासाचे, परदेशागमनाचे, तीर्थ यात्रेचे नियोजन करा. विवाह जुळून येऊ शकेल. नवीन रोजगार मिळेल. महिला : शारीरिक थकवा दुपारनंतर दूर होईल. युवक : दुपारनंतर एखादी चांगली बातमी समजल्याने मनावरील ताण कमी होईल.
सिंह
महत्वाची मीटिंग सकाळच्या वेळेत घ्या. शारीरिक तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. महिला : इतरांच्यावर अवलंबून असलेली कामे दुपारपूर्वी उरका. दुपारनंतर शारीरिक थकवा जाणवेल. युवक : एखाद्या विपरीत घटनेतून फायदा संभवतो.
कन्या
सकाळी एकट्याने सुरु केलेल्या कामाला दुपारपासून इतरांची मदत लाभेल. महिला : आजूबाजूस आज सहकार्याचे वातावरण राहील. युवक : इतरांच्या टिकेचे लक्ष्य बनाल. एखाद्या महत्वाच्या कामासाठी मंजुरी अपेक्षित असेल तर ती मिळेल.
तूळ
एखादे नावडते काम टाळण्याचा आपला प्रयत्न असेल. दुपारनंतर तेच काम तुम्हाला करावे लागेल. महिला : संततीचा सहवास लाभेल. धार्मिक कामाची आवड राहील. युवक : भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व द्या. दुपारनंतर इतरांच्या टिकेचे लक्ष्य बनाल.
वृश्चिक
प्रशिक्षणासाठी निवड होईल. दुपारनंतर सत्संग घडेल. महिला : घरातील जबाबदारीची जाणीव राहील. संतती सौख्य लाभेल. युवक : विवाहोत्सुकांचे विवाह जुळून येतील. नवीन रोजगार मिळेल.
धनु
महत्वाच्या गाठी-भेटी घ्याल. पत्रव्यवहार कराल. दुपारनंतर घरा-तील जबाबदारीकडे लक्ष द्याल. महिला : सकाळपासून एवढे कामात रहाली की दुपारनंतर विश्रांतीची आवश्यकता भासेल. युवक : सभा-संमेलनासारख्या कार्यक्रमांना हजेरी लावाल.
मकर
कुटुंबासाठी व भावंडांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. दुपार-नंतर सभासंमेलनांना हजेरी लावाल. महिला : कुटुंबासाठी लाग-णाऱ्या वस्तुंची खरेदी कराल. युवक : कुटुंबात गप्पा मारणे आवडेल. दुपारनंतर घराबाहेरील कामे निघतील.
कुंभ
स्वत:च्या आवडी-निवडीकडे लक्ष द्याल. कुटुंबाच्या आवडी-निवडीकडे लक्ष देता येईल. महिला : गोडधोड जेवणाचा बेत कराल. कुटुंबाच्या गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल. युवक : नवीन रोजगार मिळेल. विवाहोत्सुकांचे विवाह जुळून येऊ शकतील.
मीन
आशावादी बनाल. महत्वाकांक्षी बनाल. सकाळपासून रेंगाळलेली कामे दुपारनंतर कराल. महिला : सकाळपासून आळसात वेळ घालवाल. दुपारनंतर मात्र अंग झटकून कामाला लागाल. युवक : विवाह जुळून येऊ शकतील. नवीन रोजगार मिळू शकेल.