Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
  उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा केव्हाच वाजले. आपल्यावरच्या अन्यायाची दाद मागायसाठी पोलीस ठाण्याची पायरी चढाईचे धाडस या राज्यातल्या गोरगरीबांना होत नाही. पोलीस ठाण्यात गेल्यास, पोलीस तक्रार ऐकण्याऐवजी, तक्रार करायला गेलेल्या लोकांनाच दमात घेतात.

Thursday, March 11, 2010 AT 10:03 PM (IST)

  झारखंड राज्यात आदिवासी जाती-जमातींची संख्या अधिक. गर्द जंगलांनी वेढलेल्या भागात आदिवासी अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत आणि गरिबीत राहतात. या समाजात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने, सावकार त्यांना लुटतात, लुबाडतात. आजारपण, सण-समारंभ आणि कौटुंबिक अडचणींसाठी आदिवासी गावातल्या सावकाराकडून पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम कर्जावर घेतात. या कर्जाला वार्षिक पंचवीस ते पन्नास टक्क्यांपर्यंतचे भरमसाठ व्याज सावकार आकारतो.

Wednesday, March 10, 2010 AT 09:53 PM (IST)

देशाच्या कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया घालणाऱ्या किर्लोस्कर उद्योग समूहाचा शताब्दी सोहळा 10 मार्च रोजी (आज) किर्लोस्करवाडीत साजरा होत आहे. देशात आणि जगभरात अभियांत्रिकी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या किर्लोस्कर उद्योग समूहाची पायाभरणी बरोबर 100 वर्षांपूर्वी औंध संस्थानातल्या कुंडल जवळच्या ओसाड माळरानावर झाली. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी या भूमीत नव्या उद्योगाचा पाया जिद्दीने घातला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी, किर्लोस्कर उद्योगनगरी उभारली.

Wednesday, March 10, 2010 AT 12:51 AM (IST)

प्रेम, प्रेम, प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं। असं कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं म्हणणं असलं तरी, प्रत्यक्षात मात्र प्रेमात पडलेल्या युवक-युवतींना जगाचंही भान नसतं. गरीब, श्रीमंत, जातीभेद, धर्म, प्रांत-देश ही सारी बंधनं प्रेमिक झुगारून लावतात. प्रेमापुढं सारं जग त्यांना शून्य वाटतं. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांच्यात आपल्या आई-वडिलांचा विरोधही धुडकावून लावायचं धाडस असतं.

Tuesday, March 09, 2010 AT 12:51 AM (IST)

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी, आपल्या वादावादी-भांडणाच्या "तमाशा'चा फड दुबईतही गाजवलाच! जेथे कौतिकराव तेथे मानापमानाच खेळ रंगणारच आणि त्यांच्या मग्रुरीचा फटका संयोजकांना बसणारच, याची खात्री मराठी साहित्य रसिकांना आहेच. दुबईतल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात नेमके तसेच घडले.

Monday, March 08, 2010 AT 01:48 AM (IST)

या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या... अशी आर्त हाक चिमण्यांना महानगरी मुंबईतल्या पक्षीमित्र आणि पर्यावरणप्रेमींना घालायची वेळ, पर्यावरणाच्या ऱ्हासाने आणि वाढत्या औद्योगीकरणाने आली. एक काळ मुंबई हिरवीगार होती. गिरगाव, पारले, दादर या भागात झाडे होती. तीन चार मजली जुन्या चाळी होत्या. हजारो चिमण्यांची घरटी या चाळीतल्या खोल्यात होती. चाळकरी आणि चिवचिव करणाऱ्या चिमण्यांचे अतूट नाते होते. मुंबईकरांची पहाट चिमण्यांच्या चिवचिवटानेच सुरु होई.

Saturday, March 06, 2010 AT 12:47 AM (IST)

नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांच्या जयंती आणि पुण्यतिथी समारंभात आमचे मंत्री, पुढारी या नेत्यांचा आदर्श समाजाने घ्यावा, अशा उपदेशाचे डोस आवर्जून जनता आणि विद्यार्थ्यांना पाजतात. समाजात आता पूर्वीसारखे आदर्श उरले नाहीत, असे गळा काढून सांगतात. पण यातला एकही मंत्री, पुढारी समाजाला आदर्श वाटत नाही, हे कटू सत्य आहे.

Thursday, March 04, 2010 AT 11:46 PM (IST)

होय! चंद्रावर पाणी आहे. हा शोध लावला भारताच्या चांद्रयान-1 वर बसवलेल्या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या उपकरणाने! सिंथेटिक अँपचेर रडारने चंद्राच्या उत्तर ध्रुवाच्या भागाच्या केलेल्या सर्वेक्षणात, चंद्राच्या पृष्ठभागावर थोडा थोडका नव्हे, साठ कोटी मेट्रिक टन इतका प्रचंड बर्फाचा साठा आढळला. दोन ते तीन किलो मीटर व्यासाच्या खड्ड्यात हा बर्फ असल्याचा नासाच्या शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे.

Thursday, March 04, 2010 AT 12:22 AM (IST)

काय ग!, तुझा नवरा तुला खूप बडवतो तरी तू ते सहन कशी करतेस? असल्या बडवणाऱ्या नवऱ्याला धडा शिकवायला हवा. तू अजिबात सहन करू नकोस. अगं, माझ्यावर त्यांचं खूप खूप प्रेम आहे. ते काही मला रोज मारत नाहीत. कधी तरीच मारतात. पण तेही प्रेमानंच बरं! त्यांचा मार खाल्ल्यावर मलाही खूप खूप बरं वाटतं. इतकी वर्ष लग्नाला झाली तरी माझ्यावरचं त्यांचं प्रेम तीळभरही कमी झालेलं नाही.

Tuesday, March 02, 2010 AT 10:24 PM (IST)

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी.... कविवर्य सुरेश भट यांनी माय मराठीची ही अशी महती गायली असली तरी, इंग्रजीचे भूत मानगुटीवर बसलेल्या माय मराठीच्या करंट्या लेकरांनीच तिची घोर विटंबना आणि उपेक्षा सुरु ठेवली, याची शरम मराठी भाषिकांना वाटायला हवी. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन "मराठी भाषादिन' म्हणून मुंबईत साजरा झाला.

Tuesday, March 02, 2010 AT 01:30 AM (IST)

MadhuMilan
Jobs In My Circle
ePaperGallery
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: