Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  राष्ट्रीय वार्ता

नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) : कैद्यांना हातकडी घालण्याचा रिवाज आता नित्यनियमांचा झाला आहे, परंतु दिल्लीच्या एका न्यायालयाने कैद्यांना हातकडी घालणे हे त्यांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन ठरते, असे म्हटले आहे. या न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही संशयित आरोपीला कैदी म्हणून नेले जात असताना पोलीस कर्मचारी आपल्या सोईसाठी कैद्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करू शकत नाहीत.

Friday, September 03, 2010 AT 12:35 AM (IST)

वॉशिंग्टन, दि. 2 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान क्षेत्रात चिनी ड्रॅगनने पाकिस्तानच्या संमतीने हात-पाय पसरले असून तेथे चिनी सैनिकांनी पक्के रस्ते बांधण्याचे आणि मोठ्या प्रमाणावर विविध बांधकामे सुरू केली आहेत. चिनी सैनिकांच्या या कृतीमुळे भारताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरवरील भारताचा हक्क त्यामुळे कमजोर होवू शकतो.

Friday, September 03, 2010 AT 12:26 AM (IST)

लंडन, दि. 2 (वृत्तसंस्था) : "स्पॉट फिक्सिंग'चे स्कॅंडल उघड झाल्याने पाक संघ कठीण परिस्थितीतून जात असला तरी हे स्कॅंडल बाजूला ठेवून संघाचे नेतृत्व चांगल्या पध्दतीने करण्याचा विश्वास पाकच्या वनडे संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केला. तो म्हणाला, काही खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाल्याने संघ कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यात संशय नाही. त्यामुळे आम्हाला दु:ख झाले आहे. मात्र हा वाद लवकरच संपुष्टात येईल.

Friday, September 03, 2010 AT 01:05 AM (IST)

पाटणा, दि. 2 (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण करून ज्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना बंदी बनवले आहे, त्यापैकी एक अभय यादव याला त्यांनी खलास केल्याचे वृत्त धडकले आहे या नक्षलवाद्यांनी अपहृत चार कर्मचाऱ्यांना मुक्त करण्यासाठी आपल्या आठ साथीदारांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणी केली होती व त्यासाठी मुदत दिली होती. ही मुदत संपताच नक्षलवाद्यांनी अपहृत अभय यादव यांना ठार मारल्याचा दावा एका स्थानिक टीव्ही चॅनलवरून करण्यात आला.

Friday, September 03, 2010 AT 12:34 AM (IST)

जम्मू, दि. 2 (वृत्तसंस्था) :पुँछ जिल्ह्यात आज (गुरुवारी) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. गोळीबारानंतर दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांच्या घेरावातून पळ काढण्यात यश आले. जम्मूपासून 200 कि. मी. अंतरावर असलेल्या पुँछ जिल्ह्यातील संजोट जंगल क्षेत्रात हा गोळीबार झाला. या परिसरात दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर राष्ट्रीय रायफल दलाच्या आणि विशेष सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला तसेच परिसरात शोध मोहिमही सुरू केली.

Friday, September 03, 2010 AT 12:33 AM (IST)

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: