Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  खेळ वार्ता

ऑकलंड, दि. 11 (वृत्तसंस्था) : चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने चॅपेल-हॅडली चषक आपल्याकडेच राखला. कर्णधार रिकी पॉंटिंग व कॅमेरुन व्हाईट यांना या विजयाचे श्रेय दिले पाहिजे. डकवर्थ-लुईस नियमानुसार मिळालेले 200 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला या दोघांमुळेच 17 चेंडू राखून पार करता आले. या विजयाने पाच सामन्यांच्या मालिकेत कांगारुंनी 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाने 44.

Friday, March 12, 2010 AT 01:09 AM (IST)

नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : इराणमधील तेहरान येथे झालेल्या आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या विकास कृष्णन (60 किलो) व नवीनकुमार (81 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. अन्य तीन भारतीय बॉक्सरना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. देवेंद्रोसिंग लशिराम (48 किलो), वेंकटगिड्डी नागार्जुन (57 किलो) व सुमित सांगवान (75 किलो) यांना अंतिम फेरीतील मुकाबल्यामध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभवाची चव चाखावी लागली.

Friday, March 12, 2010 AT 01:08 AM (IST)

कुसुंबी, दि. 11 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लांब पल्ल्यांच्या जलतरण मोहिमा यशस्वी करुन सातारचे नाव उज्ज्वल करणारी सागरकन्या कु. स्नेहल कदम ही शनिवार, दि. 13 रोजी कण्हेर धरणात साहसी मोहीम पूर्ण करणार आहे. या मोहिमेदरम्यान ती कण्हेर धरणात मेढा ते चिंचणी हे 15 किलोमीटरचे अंतर बॅकस्ट्रोकने पोहून पार करणार आहे. स्नेहलच्या या मोहिमेचा प्रारंभ शनिवारी सकाळी 8 वाजता मेढा-मोहाट पुलापासून होणार आहे. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी आ.

Friday, March 12, 2010 AT 01:13 AM (IST)

चित्तगाव, दि. 11 (वृत्तसंस्था) : बांगलादेशचा अवघा 22 वर्षे वयाचा क्रिकेटपटू रकिबुल हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अकस्मात निवृत्ती जाहीर केली. इंग्लंडविरुध्द पहिली कसोटी दोन दिवसांवर आली असताना हसनने बुधवारी बांगलादेशला धक्का दिला. मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या हसनने व्यवस्थापक शफिकुल हक यांच्याकडे दुपारी आपले निवृत्तीचे पत्र सोपवले. त्यानंतर तो चित्तगावमधून विमानाने बाहेर गेला.

Friday, March 12, 2010 AT 01:15 AM (IST)

नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : वेगवान हॉकी खेळणाऱ्या दोन संघांची थरारक लढत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना पहायला मिळाली. या विश्वचषक स्पर्धेतील हॉलंडची वाटचाल रोखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. अतिशय चुरशीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने 2-1 असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. वेगवान हॉकी खेळणाऱ्या हॉलंडने ऑस्ट्रेलियाला तगडे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियानेही तोडीस तोड वेगवान खेळ करुन हे आव्हान पेलले.

Friday, March 12, 2010 AT 01:15 AM (IST)

चित्तगाव, दि. 11 (वृत्तसंस्था) : बांगलादेशविरुध्द उद्यापासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत फिरकी आक्रमणाला तोंड देण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. दोन कसोटींच्या या मालिकेत इंग्लंडला विजय मिळवायचा असेल तर त्यांना अल्पसंतुष्ट राहून चालणार नाही. वनडे मालिकेत बांगलादेशला व्हाईटवॉश देणाऱ्या इंग्लंडला कसोटी मालिकेत मात्र फिरकी आक्रमणाचा मुकाबला करावा लागेल. इंग्लिश फलंदाजांसमोर ते एक आव्हानच आहे.

Friday, March 12, 2010 AT 01:14 AM (IST)

नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : हॉकी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळालेला भारतीय हॉकी संघ गेल्या 16 वर्षांमधील सर्वोत्तम म्हणजे 7 वे स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी त्यांना उद्या अर्जेंटिनावर मात करावी लागेल. जर्मनीतील मोंचेनग्लाडबाक येथे 2006 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताला जवळपास तळाचे म्हणजे 12 संघांमध्ये 11 वे स्थान मिळाले होते.

Friday, March 12, 2010 AT 01:11 AM (IST)

नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : विश्वचषक स्पर्धेच्या "अ' गटात बलाढ्य ऑस्ट्रेलियासह भारत, पाक, दक्षिण आफ्रिका यांना नमवून दिमाखात उपांत्यफेरी गाठणाऱ्या इंग्लंडचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न युरोपातील पॉवरहाऊस जर्मनीने उद्‌ध्वस्त केले. जर्मनीने इंग्लंडचा 4-1 असा धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत जर्मनीची गाठ युरोपातील आणखी एक पॉवरहाऊस हॉलंडला नमवणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी पडेल.

Friday, March 12, 2010 AT 01:07 AM (IST)

नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : अचानक उसळी घेतलेल्या कॅनडाने जादा वेळेत पाकिस्तानचा पराभव करुन विश्वचषक हॉकी स्पर्धेत 11 वे स्थान मिळवले. या पराभवामुळे पाकच्या संघाची विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मानहानीकारक कामगिरी नोंदवली गेली. दरम्यान, या पराभवाचे खापर सदोष संघनिवडीवर फोडून पाक हॉकी फेडरेशनने निवड समितीच निकालात काढली आहे. चार वेळच्या विश्वविजेत्या पाकिस्तानवर या स्पर्धेत सर्वात नामुष्कीजनक परिस्थिती ओढवली.

Friday, March 12, 2010 AT 01:06 AM (IST)

फलटण, दि. 10 : येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य शिवाजीराव घोरपडे यांची नात व पुणे येथील बॅडमिंटनपटू कु. संयोगिता घोरपडे हिचा ज्युुनिअर अशियाई बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा मलेशियामध्ये  होणार आहे. कु. संयोगिता ही पुण्यातील ज्युनिअरची अव्वल बॅडमिंटनपटू असून तिने आतापर्यंत अनेक अजिंक्यपदे पटकाविली आहेत.

Wednesday, March 10, 2010 AT 10:26 PM (IST)

MadhuMilan
Jobs In My Circle
ePaperGallery
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: