|
|
|
|
|
|
|
खटले आणि दाव्यांचे निराकरण गाव पातळीवरच्या गोतसभेत, परगण्याच्या पंचायतीत व्हावे, अशी राज्यकर्त्यांची इच्छा असे. त्यामुळे कोणतेही दावे आणि खटले फार काळ चालत नसत. गुन्हेगारावरचा खटला लगेचच चालवला जाई. ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्यालाही गोतसभा किंवा पंचायत सभेकडून लगेचच न्याय मिळत असे. या राज्यात न्याय मिळतो, अशी प्रजेची भावना होती.
Saturday, March 13, 2010 AT 12:56 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
महाराष्ट्राच्या कृषी, औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांची दि. 12  मार्च 2010 (आज) रोजी 97 वी जयंती. महाराष्ट्राच्या मातीवर अपार प्रेम असलेल्या या सुसंस्कृत नेत्याच्या कार्याने भारतात आलेल्या प्रकाशपर्वाचा  घेतलेला हा मागोवा...
Thursday, March 11, 2010 AT 10:06 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
पोलीस भरतीसाठी लाखोंच्या संख्येने येणारे तरुण आणि त्यांच्यावर नियंत्रण न ठेवता आल्याने होणारा सावळागोंधळ ही नित्याची बाब झाली आहे. मात्र, त्यातून घडणाऱ्या दुर्घटना चिंताजनक आहेत. मुंबईत अलीकडेच भरती प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळात एकाला जीव गमवावा लागला तर अन्य जखमी झाले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी भरती प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुटसुटीत करणे हितावह ठरेल.
Wednesday, March 10, 2010 AT 09:55 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : अर्धी दुनिया ज्याची आतुरतेने वाट पहात आहे, ते ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक महाभारत घडून आज मंगळवारी राज्यसभेत दोन तृतियांश बहुमताने मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने एकूण 233 सदस्यांपैकी 186 सदस्यांनी मतदान केले. एका सदस्याने विधेयकाच्या विरोधात मत नोंदविले. तृणमूल कॉंग्रेसने मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला तर बसपाने मतदानावर बहिष्कार टाकला.
Wednesday, March 10, 2010 AT 01:39 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
  लोकनेते बाळासाहेब देसाई यांची बुधवार, दि.  10 मार्च 2010 रोजी (आज) 100 वी जयंती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे साजरी होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या लोकहितदक्ष कार्याचा मागोवा... महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रचंड कार्य केले. छ. शिवाजी महाराज, कोल्हापूरचे छ. शाहू महाराज, महात्मा फुले ही त्यांचे दैवते.
Wednesday, March 10, 2010 AT 12:54 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
शिक्षणासारख्या मूलभूत बाबीकडे शासन पुरेसे लक्ष देत नाही अशी तक्रार वेळोवेळी केली जाते. शिवाय शासनाचे शिक्षकांबाबतचे दुटप्पी धोरण अनेकदा दिसून आले आहे. कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनवाढीच्या प्रस्तावावर अजूनही विचार होत नाही. अन्य शिक्षकांवर सहाव्या वेतन आयोगानुसार कोट्यवधींच्या रकमेची खैरात करताना कंत्राटी पद्धतीच्या शिक्षकांना मात्र सापत्न भावाची वागणूक दिली जात आहे.
Tuesday, March 09, 2010 AT 01:05 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
  ज्वारी हे महाराष्ट्रीयन लोकांचे मुख्य अन्न नसल्याने यापुढे ज्वारीचा उपयोग मद्यार्क निर्मितीसाठी करणे लोकहिताचे ठरेल. दारुचा खप वाढत असल्याने, त्यानुसार पुरवठा करणे हे जनहिताचेच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केले आहे. धान्यापासून मद्यनिर्मिती तयार करण्याचे धोरणाच्या समर्थनार्थ, महाराष्ट्र शासनाचे वतीने मुंबई उच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र सादर केले गेले आहे.
Monday, March 08, 2010 AT 01:46 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
वार्षिक सातशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात "गोकुळ' मध्ये संघामध्ये काही चांगल्या बाजू, प्रवृत्तींच्या बरोबर काही वाईट, काळ्या बाजूंचाही शिरकाव झाला आहे. संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर व महाव्यवस्थापक आर. सी. शहा यांनी गोकुळ दूध चोरी आणि भेसळीचे मोठे प्रकरण उघडकीस आणले.
Saturday, March 06, 2010 AT 12:51 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
प्रमोद महाजन यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी प्रवीण महाजनला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. ब्रेन हॅमरेजच्या तीन महिन्यांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळेे महाजन कुटुंबियांची शोकांतिका नव्याने जगापुढे आली. द्वेष, मत्सर आणि हिंसेने केलेल्या कृत्याचा परिणाम केवळ कृत्य करणाराच भोगत नाही तर अनेक निरपराधांनाही भोगावा लागतो, हे या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. प्रमोद महाजन यांच्या हत्याकांडातील आरोपी प्रवीण महाजन याचे निधन झाले.
Thursday, March 04, 2010 AT 11:49 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
खासगी सावकाराकडून होणाऱ्या कर्जदारांच्या छळाविरोधात तक्रारी दाखल झाल्यानंतर यासंदर्भात कायदेशीर पावले उचलण्यात आली. मात्र, काही बॅंका, सोसायट्या, पतपेढ्या कर्जवसुलीसाठी संबंधितांची छळवणूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषत: कर्जदाराकडून तारण म्हणून पुढच्या तारखेचे चेक्स घेऊन ते बॅंकेत दाखल करण्याची आणि ते न वठवता परत आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्याचे प्रयत्न सर्रास होत आहेत.
Thursday, March 04, 2010 AT 12:25 AM (IST)
|
|
|
|
|
|
|