|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 29 : मेथीची पेंडी 2 रुपये, पालक 5 रुपयांना दोन पेंड्या, कोथिंबीर पेंडी 1 रुपया, वांगी 20 रुपये किलो असा निम्म्याहून कमी दरात भाजीपाला असून मुसळधार पाऊस आणि बाजारात पालेभाजी, फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर झालेली आवक यामुळे भाजीपाल्यांचे दर उतरले आहेत. जवळजवळ निम्म्याहून कमी दर झाल्याने आता सर्वसामान्यांना भाजी घेणे परवडणार असल्याने भरपावसातही मंडईत गर्दी होताना दिसत आहे.
Friday, July 30, 2010 AT 02:05 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 29 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. 1 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीत निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, अधिक्षक, सांख्यिकी अधिकारी या पदांचे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. 30 जुलै 2010 असा आहे. परंतु संबंधित पोस्ट कार्यालयातील लाल रंगाच्या माहिती पुस्तिकांचा तुटवडा लक्षात घेता सदर पदांचे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. 20 ऑगस्ट 2010 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Friday, July 30, 2010 AT 02:04 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 29 : महमंद रफी यांच्या 30 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सरगम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महमंद रफी यांनी गायलेल्या गीतांवर आधारित "यादे रफी' हा  बहारदार गाण्यांचा कार्यक्रम शनिवार दि. 31 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता शाहू कला मंदिर येथे होणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष ऍड. बाळासाहेब बाबर यांनी दिली. स्व. महमंद रफी यांची पुण्यतिथी गेल्या पाच वर्षांपासून साताऱ्यात साजरी केली जाते.
Friday, July 30, 2010 AT 02:03 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 29 : स्वत:च्या घराची घरपट्टी न भरल्यामुळे शासनाने 18 महिने घरी पाठविलेल्या विद्यमान सदस्य असलेल्या उमेदवारास मतदारांनी कायमचा घरचाच रस्ता दाखवावा, असे आवाहन राजे पॅनेलचे प्रमुख संदीप मोझर यांनी केले. खेड ग्रामपंचायतीच्या विकासनगर वॉर्डमधील कामेश कांबळे, कासम मुल्ला व संगीता महामुनी यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.
Friday, July 30, 2010 AT 01:59 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 29 : स्वत:च्या घराची घरपट्टी न भरल्यामुळे शासनाने 18 महिने घरी पाठविलेल्या विद्यमान सदस्य असलेल्या उमेदवारास मतदारांनी कायमचा घरचाच रस्ता दाखवावा, असे आवाहन राजे पॅनेलचे प्रमुख संदीप मोझर यांनी केले. खेड ग्रामपंचायतीच्या विकासनगर वॉर्डमधील कामेश कांबळे, कासम मुल्ला व संगीता महामुनी यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.
Friday, July 30, 2010 AT 01:57 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 29 : गर्भलिंग चाचणीचा प्रयोग कोणीही करू नये. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी शासन कडक कायदे करीत आहे, असे प्रतिपादन डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले. दलित महिला विकास मंडळ व सातारा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यामाने लेक लाडकी अभियानांतर्गत पत्रकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय मांडके, जिल्हा माहिती अधिकारी माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
Friday, July 30, 2010 AT 01:53 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 29 : केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु एवंम मध्यम उद्योग विकास संस्था, भारत सरकार, मुंबई व सिध्दी विकास संस्था, इमकॉन-सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे महिलांसाठी औद्योगिक प्रेरणा अभियानाचे दीपलक्ष्मी हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते.
Friday, July 30, 2010 AT 01:52 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 28 : मंगळवार पेठेतील गजानन मिलेनियम अपार्टमेंट-मधील विश्व डिपार्टमेंटल नावाचे दुकान फोडून चोरट्यांनी 4 हजार 600 रुपये लंपास केले. याबाबत शामराव वामनराव कदम (रा. धस कॉलनी, मंगळवार पेठ) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हवालदार दबडे तपास करत आहेत.
Thursday, July 29, 2010 AT 02:56 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 28 : बोरखळ (ता. सातारा) येथे पटेल (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) हा सचिन बाळासाहेब रसाळ यांच्या घरात भाड्याने राहण्यास होता. त्याने बुधवारी विषारी औषध प्रशान करुन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 
Thursday, July 29, 2010 AT 02:56 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, पाटण, फलटण (प्रतिनिधी) दि. 27 ः सातारा शहर आणि परिसरासह जिल्ह्यात बेंदराच्या मुळावर लागलेल्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून चांगलेच झोडपून काढले होते. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, मंगळवारी जिल्ह्याचा काही  भाग वगळता पावसाचा जोर ओसरला होता परंतु अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळतच होत्या.
Wednesday, July 28, 2010 AT 02:19 AM (IST)
|
|
|
|
|
|
|