Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आता अंत:करणाची कोमलता आणि शुध्दता यांचे शिक्षण कसे असते ते पाहा. विद्यार्थी आणि शिक्षण यांच्या कमाईवरच चाललेल्या एका विश्वविद्यालयात "राम' गेला होता. तेथे विद्यार्थी फी वगैरे काही देत नाहीत. सामान्य शिक्षणाखेरीज शिक्षकांच्या देखरेखीखाली विद्यार्थी कॉलेजच्या जमिनीवर व यंत्रांवर काम करतात. प्रोफेसर नवीन नवीन शोध लावतात व लावण्यास शिकवितात. सर्व खर्च शेतकीच्या नवीन तऱ्हा, निरनिराळी पिके आणि नवीन कारागिरी यामुळे जे उत्पन्न येईल त्यातून चालतो.

Saturday, March 13, 2010 AT 01:18 AM (IST)

अमेरिकेतील कॉलेजची स्थिती कशी आहे पाहा. बी. ए. एम. ए. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, इत्यादी डिग्रीपर्यंत इतर अभ्यासाबरोबर शारीरिक शिक्षण दिले जाते. उत्तम शिक्षणाबरोबर शेतकी, लोहार, सुतार, आणि गवंडी यांचे काम देखील शिकविले जाते. मनुष्यामध्ये मुख्य तीन भाग आहेत. कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये आणि तिसरे अंत:करण. यांना इंग्रजीमध्ये हॅन्ड, हेड आणि हार्ट असे म्हणतात. ज्ञानेंद्रियांच्या योगाने बाहेरील ज्ञान आत जाते आणि बाह्य वस्तूंचा मनावर परिणाम होतो.

Thursday, March 11, 2010 AT 10:57 PM (IST)

अमेरिकेमध्येराष्ट्रैक्यापुढे धर्मभेदांची विशेष मातब्बरी नाही. हिंदुस्थानातील आर्यसमाजी, शीख, मुसलमान, ख्रिस्ती या सर्वांना अमेरिकेत हिंदूच म्हणतात. त्यांच्या अंत:करणात एक राष्ट्रीयत्व इतके बाणले आहे की, आपल्या इकडील धर्मभेदांहून अधिक मोठ्या धर्मभेदांकडे दुर्लक्ष करण्यास त्यांना काही कठीण जात नाही.

Wednesday, March 10, 2010 AT 09:57 PM (IST)

एक हिंदुस्थानी तरुण जपानमध्ये शिकत असता त्याने तेथील लायब्ररीतून एक यंत्रशास्त्राचा ग्रंथ मागून आणला. त्यातील मजकूर अथवा सारांश त्याने उतरून काढला. परंतु त्यातील यंत्रांच्या चित्रांची नक्कल त्याला काढता येईना. या पुस्तकाचा इतरांना देखील फायदा घ्यावयाचा आहे, याचा त्याने विचार देखील न करता चटदिशी त्याने पुस्तकातून ती चित्रांची पाने फाडून घेतली व पुस्तक परत केले. त्याने असा विचार केला नाही की, या आपल्या कृत्याने आपल्या साऱ्या देशाचे नाव बदनाम होईल.

Wednesday, March 10, 2010 AT 12:55 AM (IST)

रोख धर्माचे रहस्य हे आहे, की साऱ्या राष्ट्राचा आत्मा आपलाच आत्मा आहे, असे जाणले पाहिजे. या धर्माचे हे रहस्य ज्या राष्ट्रांमध्ये जाणून अमलात आणले आहे त्यांची उन्नती झाली आहे. ज्या राष्ट्रांमध्ये हे रहस्य नाही, ती अवनत दशेला गेली आहेत. आमच्या देशासंबंधी एक गोष्ट मोठ्या दु:खाने सांगितली पाहिजे. सध्या हॉंगकॉंग येथे शीख लोकांची पलटण आहे. त्यापूर्वी तेथे पठाणांची फौज होती.

Tuesday, March 09, 2010 AT 01:18 AM (IST)

काही हिंदुस्थानी तरुण एका जपानी जहाजामध्ये बसून चालले होते. त्यांच्या वर्गातील उतारुंना जे जेवण मिळत असे, ते काही कारणांमुळे त्यांनी घेतले नाही. एका गरीब जपानी तरुणाने पाहिले, की हे सर्व हिंदी तरुण भुकेलेले आहेत, म्हणून त्याने त्या सर्वांसाठी दूध, फळे वगैरे विकत आणून त्यांच्यासमोर ठेवली. त्यांनी प्रथम नेहमीच्या चालीप्रमाणे त्याचा स्वीकार केला नाही, पण नंतर त्यांनी ती घेऊन खाऊन टाकली.

Monday, March 08, 2010 AT 01:08 AM (IST)

सुलेमानच्या देशापेक्षा माझा देश मला अधिक आवडतो. संबुल किंवा रेहापेक्षा (सुवासिक वनस्पती) माझ्या देशातील काटाच अधिक चांगला आहे, असे म्हणून स्वत: काटा व्हायचे आणि आपल्या देशाला देखील कंटकवन बनवायचे, ही खरी देशप्रीती नव्हे! साधारणपणे एकाच तऱ्हेची झाडे एकाच ठिकाणी गर्दी करून लावली, तर ती सर्व कमजोर होतात. त्यापैकी काही जरा दूरदूर लावा, म्हणजे ती मोठी आणि मजबूत अशी होतात. राष्ट्रांना हीच गोष्ट लागू पडते.

Sunday, March 07, 2010 AT 02:23 AM (IST)

सुलेमानच्या देशापेक्षा माझा देश मला अधिक आवडतो. संबुल किंवा रेहापेक्षा (सुवासिक वनस्पती) माझ्या देशातील काटाच अधिक चांगला आहे, असे म्हणून स्वत: काटा व्हायचे आणि आपल्या देशाला देखील कंटकवन बनवायचे, ही खरी देशप्रीती नव्हे! साधारणपणे एकाच तऱ्हेची झाडे एकाच ठिकाणी गर्दी करून लावली, तर ती सर्व कमजोर होतात. त्यापैकी काही जरा दूरदूर लावा, म्हणजे ती मोठी आणि मजबूत अशी होतात. राष्ट्रांना हीच गोष्ट लागू पडते.

Sunday, March 07, 2010 AT 01:50 AM (IST)

अमेरिकन लोक डॉलरचे दास आहेत असे म्हणतात. ते खरे नाही. उलट डॉलर विद्येच्या मागून आपोआप येतात. जे लोक अमेरिकन लोकांना हा दोष लावतात त्यांचा धर्म रोख ना. पण पैसा हाच त्यांचा धर्म आहे किंवा अमेरिकेची वस्तुस्थिती त्यांना माहीत नाही. खरे पाहता "द्राक्षे आंबट आहेत' या कोटीतलाच तो दोष आहे. कॅलिफोर्नियामधील एका बाईने अठरा कोटी रुपये देऊन एक विश्वविद्यालय स्थापन केले आहे. याच प्रमाणे ज्ञानाची बुध्दी अठरा कोटी रुपये देऊन एक विश्वविद्यालय स्थापन केले आहे.

Saturday, March 06, 2010 AT 12:52 AM (IST)

तुमचा हात गोरापान आहे, त्यातील रक्त अगदी शुध्द आहे, परंतु जर मनगटावर गच्च पट्टी बांधली तर हातातील रक्त हातातच राहील. शरीराच्या इतर भागात ते खेळावयाचे नाही व ते लवकरच नासून जाईल आणि हात सुकून जाईल. त्याचप्रमाणे जो देश आम्हीच मोठे आहोत, आम्ही चांगले आहोत, आम्ही थोर आहोत, आम्हाला म्लेच्छांशी व काफिरांशी संबंध ठेवण्याची काय जरुरी आहे? असे म्हणून स्वत:ला इतरांपासून अलग ठेवतो, तो स्वत:वर पट्टी बांधून घेतो व स्वत:ला आपण होऊन कृश करून घेतो.

Friday, March 05, 2010 AT 01:02 AM (IST)

MadhuMilan
Jobs In My Circle
ePaperGallery
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: