Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  विभागीय वार्ता

कराड, दि. 29 : कराडमधील नवीन कृष्णा पुलाखालील नदीपात्रात आणि मलकापूर हद्दीत नटराज थिएटरसमोरच्या नाल्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंद्रुळकोळे, ता. पाटण येथील प्रताप विष्णू पाटील (वय 62) हे दि. 27 रोजी ढेबेवाडी येथे वांग नदीपात्रात पोहायला गेले होते. पावसाची संततधार सुरु असल्यामुळे नदीला आलेल्या पुरात ते वाहून गेले होते. गेले दोन दिवस त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

Friday, July 30, 2010 AT 02:55 AM (IST)

  चाफळ, दि. 29 : चाफळ परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसाची नोंद ठेवणारी पर्जन्यमापक यंत्रे नादुरुस्त अवस्थेत असल्याने पावसाची खरी नोंद मिळण्यास अडचणी येत आहेत. विद्यालयाच्या पटांगणावर असलेले पर्जन्यमापक अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तहलीलदार यांनी संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे. चाफळ हा दुर्गम व डोंगराळ असा विभाग असल्याने याठिकाणी पावसाचे प्रमाण भरपूर असते.

Friday, July 30, 2010 AT 01:57 AM (IST)

फलटण, दि. 27 : कालव्याच्या वाहत्या पाण्यावर ऊर्जानिर्मिती करणारा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प येथील संशोधक अ. रा. भांबुरे यांनी नीरा उजवा कालव्याच्या फाटा क्र. 24 (विडणी) येथे यशस्वीरित्या कार्यान्वित करुन वीजनिर्मिती सुरु केली आहे.

Wednesday, July 28, 2010 AT 02:32 AM (IST)

कराड, दि. 26 : येथील स्वच्छंद विहार संस्थेच्यावतीने "मूल शिकते कसे?' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. 31 जुलै रोजी दुपारी 2 ते सायं. 5 या वेळेत स्व. सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात व रविवार, दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. कार्यशाळेत महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे संचालक प्रा.

Tuesday, July 27, 2010 AT 12:42 AM (IST)

चाफळ, दि. 26 : गुरूशिवाय ज्ञान नाही. मोक्षाचा मार्ग सापडत नाही. यासाठी आपले जीवन सुखी करण्यासाठी प्रत्येकाने गुरूचे ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन भूषण स्वामी यांनी केले. तीर्थक्षेत्र चाफळ, ता. पाटण येथील श्रीराम देवस्थान ट्रस्ट व स्वामी यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित गुरूपौर्णिमा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यवस्थापक बा. मा. सुतार, पांडुरंग बुवा शास्त्री, श्रीमती जीवनकला स्वामी, वासुदेव पूरकर, सौ. भार्गवी स्वामी, सौ.

Tuesday, July 27, 2010 AT 12:38 AM (IST)

सातारारोड, दि. 26 : येथील चंद्रकांत वसंतरावदादा पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया-मध्ये इतर विद्यार्थ्यांंसमवेत आठ अंध विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणामुळे भारतीयांची प्रगती या विषयावर शोधनिबंध लिहिण्यासाठी युरोप व अमेरिकेमधून 2 शिक्षिका व 1 शिक्षक यांनी या विद्यालयास नुकतीच भेट देवून अंध विद्यार्थ्यांशी दुभाषाच्या सहकार्याने संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Tuesday, July 27, 2010 AT 12:36 AM (IST)

फलटण, दि. 26 : सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार वाढण्याची तसेच स्वाईन फ्ल्यू सारखे आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन बिबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने ताथवडा व अन्य ठिकाणी ग्रामसभा घेवून करण्यात येत असल्याचे प्राथमिक अरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. डब्ल्यू. कुलकर्णी यांनी सांगितले.

Tuesday, July 27, 2010 AT 12:05 AM (IST)

फलटण, दि. 26 : उत्तम प्रशासक आणि संघटक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या जलसंपदा व ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त, राज्याचे जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा, विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल आ. विनायकराव मेटे व आ. प्रकाश बिनसाळे यांच्या जाहीर नागरी सत्काराचे आयोजन येथील मुधोजी क्लबच्या प्रशस्त मैदानावर गुरुवार, दि. 29 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे.

Tuesday, July 27, 2010 AT 12:00 AM (IST)

कराड, दि. 26 : लायन्स क्लब ऑफ कराडने 1966 पासून उल्लेखनीय समाजसेवा केली आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत या क्लबचे सेवाकार्य पोहोचत असून शासन दरबारीही कार्याची नोंद झाली आहे. सध्या लायन्स आरोग्य सेवा संकुलानातून जे काम सुरु आहे, त्यामुळे समाजाचाही क्लबकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असे प्रतिपादन माजी प्रांतपाल प्रा. डॉ. राजेंद्रभाई शहा यांनी केले. लायन्स क्लब ऑफ कराडच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.

Monday, July 26, 2010 AT 11:24 PM (IST)

पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांपासून पुण्या मुंबईसह राज्यात संततधार सुरू असणाऱ्या पावसाचा जोर पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांमध्ये कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. ओरिसा किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढली आहे. पुण्यातही दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांची रविवारची सुट्टी पाण्यात गेली.

Monday, July 26, 2010 AT 01:14 AM (IST)

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: