|
|
|
|
|
|
|
देशातल्या शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार मिळवून द्यायसाठी गेली 26 वर्षे अखंड संघर्ष करणारे शेतकऱ्यांचे लाडके नेते खा. शरद जोशी यांनी शुक्रवारी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. शेतकरी संघटनेची स्थापना त्यांनी केली, तेव्हा बरोबर असलेले त्यांचे काही सहकारी संघटना सोडून गेले. त्यांनी स्वतंत्र शेतकरी संघटना स्थापन केल्या.
Saturday, September 04, 2010 AT 12:57 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
  देबू देवधर हे मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतले फक्त चलत्चित्र छायाचित्रकार नव्हते. चित्रपटाची कथा, सामाजिक परिस्थिती, चित्रपटातील भूमिका, निसर्ग, काळ, या साऱ्यांचा प्रचंड अभ्यास करूनच, ते छायाचित्रण करीत असत. त्यामुळेच त्यांनी छाया-चित्रित केलेल्या सर्व चित्रपटांची, प्रचंड प्रशंसा झाली. ते अत्यंत निर्दोषपणे चित्रपटाचे छायाचित्रण करीत असत. छायाचित्रण हा त्यांचा श्वास होता.
Thursday, September 02, 2010 AT 10:44 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 28 वर्षांपूर्वी झालेल्या भोपाळ गॅस हत्याकांड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात फेरसुनावणी सुरु झाली आहे. डिसेंबर 1994 मध्ये युनियन कार्बाईडच्या कारखान्यात झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे भोपाळ शहरातील पंधरा हजार लोक तडफडून ठार झाले होते. गॅस गळतीमुळे सहा लाख लोकांना असाध्य विकाराने ग्रासले. या गॅस कांडामुळे उद्ध्वस्त झालेल्या गॅस पीडितांनी संघर्ष करूनही त्यांना न्याय मिळाला नाही.
Wednesday, September 01, 2010 AT 10:47 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
  गेले दोन महिने पोलिसांच्या नियंत्रणात आलेला नक्षलवाद्यांचा हिंसाचार बिहार राज्यात पुन्हा नव्याने सुरु झाल्यामुळे,  मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारची कोंडी झाली आहे. विधानसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या असतानाच, राज्याला दुष्काळाने ग्रासले. आता नक्षलवाद्यांच्या वाढत्या हालचालीमुळे, दहशतीचे निर्माण झालेले वातावरण, राज्य सरकारला महागात पडेल.
Wednesday, September 01, 2010 AT 12:23 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
  राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे रुंदीकरण करायसाठी केंद्र सरकारने "बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा', हे धोरण स्वीकारून, रस्त्यांच्या रुंदीकरणाला गती दिली. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे जलदगतीने रुंदीकरण-नूतनीकरण आणि चौपदरीकरणही झाले. या रस्त्यांच्या बांधकामासाठी झालेला खर्च वसूल करायसाठी सरकारने राज्यभर या रस्त्यांवर टोल नाकी सुरु केली. टोल नाक्यांचे ठेके देण्यात आले.
Monday, August 30, 2010 AT 11:12 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
  कम्युनिस्ट चीनचा भारताला धोका असल्याचे, समाजवादी नेते राममनोहर लोहिया सातत्याने माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना बजावत होते. पण, आपणच जागतिक शांततेचे ठेकेदार असल्याचा लौकिक मिळवायसाठी नेहरूंनी राष्ट्रहिताला तिलांजली देत, तिबेटचा घास चीनच्या घशात घातला. उत्तर सीमेशी चीनच्या सीमा भिडल्या. 1962 मध्ये याच चीनने भारतीय लष्कराचा लाजिरवाणा पराभवही केला. तरीही पं. नेहरूंनी परराष्ट्र धोरणात मूलगामी बदल केले नाहीत.
Sunday, August 29, 2010 AT 09:36 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
मुकेश अंबानी हे गेली दोन वर्षे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. पण, त्यांना श्रीमंतीचा वारसा त्यांचे वडील धीरुभाई अंबानी यांच्याकडून मिळालेला होता.
Saturday, August 28, 2010 AT 12:01 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
  बालकांच्या कल्पनासृष्टीत शिरून, त्यांच्यासाठी बालकथा लिहिणं तसं खूप अवघड! मराठी साहित्यात साने गुरुजी, ना. धों. ताम्हणकर, जी. ए. कुलकर्णी, विंदा करंदीकर, शांता शेळके, गो. नि. दांडेकर, कुसुमाग्रज, भा. रा. भागवत, शांता शेळके यांनी लिहिलेल्या बालकथांची परंपरा पुढं मोठ्या साहित्यिकांनी फारशी टिकवली नाही. ही उणीव डॉ. अनिल अवचट  यांनी भरून काढली.
Thursday, August 26, 2010 AT 11:00 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
नोएडा-आग्रा या नव्या द्रुतगती महामार्गासाठी उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने ताब्यात घेण्याला सुरु असलेला शेतकऱ्यांचा विरोध अद्यापही संपलेला नाही. गेल्या आठवड्यात अलिगढ आणि आग्रा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी संघटितपणे रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाप्रमाणे  किंमत न देता दडपशाही करून जमिनी ताब्यात घेत असल्यामुळे शेतकरी संतापल्याचे, शेत-कऱ्यांच्या सर्व दल स्थगितीचे म्हणणे आहे.
Wednesday, August 25, 2010 AT 11:17 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
गुजरात राज्यातल्या बेकायदा खाण कामावर माहिती अधिकाराच्या शस्त्राद्वारे नियंत्रण आणणाऱ्या, अमित जेठवा यांच्या खुनात भारतीय जनता पक्षाचे जुनागढचे खासदार दिनू सोळंकी यांचा पुतण्या शिवा सोळंकीचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे, राज्यात खळबळ उडाली आहे. अमित जेठवा हे गेली तीन वर्षे राज्यातल्या बेकायदेशीर खनन उद्योगाच्या विरोधात एकाकीपणे लढा देत होते.
Wednesday, August 25, 2010 AT 12:32 AM (IST)
|
|
|
|
|
|
|